🌟नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज दि.22 सप्टेंबर रोजी 100% क्षमतेने भरला....!


🌟प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना🌟  

नांदेड :- नांदेड येथील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज रविवार दि.22 सप्टेंबर 2024 रोजी 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सतत च्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व  बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग- 471 cumec (16632.00 cusec) 7.30 pm वाजता उघडण्यात येईल.

तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी अशी विनंती शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन नांदेडचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या