🌟विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : निवडणूक कामात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहावे.....!


🌟या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश आले देण्यात🌟 

परभणी (दि.30 सप्टेंबर 2024) : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 96 परभणी विधानसभा मतदार संघातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकविषयक विविध कामे पार पाडण्यासाठी आदेश तयार करण्यात आले असून, या आदेशामध्ये 33 कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकारी-कर्मचा-यांना कक्ष निहाय आदेश पारित करण्यात आले आहेत. या कक्षातील सर्व नियुक्त अधिकारी कर्मचा-यांची बैठक मंगळवार, (दि.०१) रोजी दुपारी १२ वाजता नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचा-यांना आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीस विविध नियुक्त कक्षातील सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने नेमून दिलेली कामे विहित मुदतीत पार पाडावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार परभणी यांनी केले आहे. या बैठकीस गैरहजर राहिल्यास‌ त्यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम २९ व ३० तसेच लोप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ ब. नुसार व मा. भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांचे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ९६ परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्थिर संनियंत्रण पथक, भरारी पथक , व्हिडीओ संनिरिक्षण पथक व व्हिडीओ चित्रीकरण तपासणी पथक गठीत करण्यात आले असून या पथकाची बैठक शुक्रवार (दि.४) रोजी सकाळी ११ वाजता  ठेवण्यात आली आहे.  निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीचे कामकाज सुरु असून नियुक्त पथक परभणी तालुक्यातील ३३८ मतदान केंद्रावर नियोजित कार्यक्रमानुसार दैनंदिन भेटी देवून सदर यादी भागातील मतदारांमध्ये EVM व VVPAT ची जनजागृती करत आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये तपासून घेऊन मतदान यादीत नाव नसल्यास तात्काळ Voter Help line app द्वारे आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या