🌟डॉ.सुरेश शेळके नागनाथ महाविद्यालय येथे 29 वर्षापासून हिंदी विषयाचे प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत🌟
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हिंदी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा.डॉ. सुरेश दशरथराव शेळके यांना अहिंदी भाषिक राज्यात राष्ट्रभाषा हिंदी सेवार्थ व सामाजिक योगदानाबद्दल "नॅशनल फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड-2024" ने सन्मानित करण्यात आले आहे.
ॲट्रिक हॉटेल सभागृह, शाहू नगरी, कोल्हापूर येथे कै. बसवंत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगांव जिल्हा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा द्वारे आयोजित राष्ट्रीय परिषदेत भूमा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई, न्यायमूर्ती रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रकाश कदम, डॉ. जालिंदर महाडिक, डॉ. एम.डी.पाटील, डॉ. शोभा महाजन, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे, डॉ. भीमराव खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सुरेश शेळके नागनाथ महाविद्यालय येथे 29 वर्षापासून हिंदी विषयाचे प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. बालभारती, पुणे हिंदी अभ्यास मंडळ सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्र राज्य हिंदी परिषदेचे राज्य सचिव असून शैक्षणिक कार्या सोबतच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक सहकार, कला व नाट्य क्षेत्रात ही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे त्यांनी अनेक पाठ्यपुस्तक व गौरव ग्रंथांचे संपादन ही केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'थॉटस् ऑन पाकिस्तान' या बहुचर्चित इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद ही त्यांनी केलेला आहे. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात विषयतज्ञ म्हणून सहभागी आहेत. डॉ. सुरेश शेळके हिंदी राष्ट्रभाषेच्या प्रचार-प्रसारासह राष्ट्रीय एकात्मता, संत साहित्य, भारतीय लोकशाही व संविधान या प्रासंगिक विषयांवर महाराष्ट्रासह विविध प्रांतात प्रबोधनात्मक व्याख्यानासाठी निमंत्रित असतात.
सामान्य नागरिकांसाठी अर्थसाक्षर अभियानांतर्गत आधार मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीचे ते स्थानिक अध्यक्ष असून 'महानाट्य यशोधरा' चे सहा. दिग्दर्शक आहेत.डॉ. सुरेश शेळके यांच्या अष्टपैलू कार्याबद्दल त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांना "ध्येयनिष्ठ जीवन गौरव पुरस्कार" ही प्राप्त झाला आहे हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ॲड. बाळासाहेब आंबेडकर, डॉ. चंद्रदेव कवडे, डॉ. नारायण शर्मा, डॉ. मधु खराटे, प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते, डॉ. जीजाबराव पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एस. कानवटे, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, प्राचार्य शेखर घुंगरवार व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.......
0 टिप्पण्या