🌟खरीप-2023 मधील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे🌟

परभणी (दि.26 सप्टेंबर 2024) : राज्यातील सन-2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/पोर्टलद्वारे कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीची नोंद केली आहे अशा नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु 1 हजार आणि 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच एकवेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील. तरी शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर, 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी. तसेच अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mahait.org.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्या करिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या आधार-सीड बँक खात्यांत जमा होते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे..... 

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या