🌟रोजगार संधीसाठी 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी (दि.18 सप्टेंबर 2024) : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांत रोजगार उपलब्ध करुन देणे, स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य प्रदान करणे, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनविणे ही सध्याच्या काळाजी गरज पूर्ण करण्याच्या हेतूने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सुमारे 14 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याकरीता "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांना कौशल्यावर आधारीत विविध कोर्स शिकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वा. वर्धा येथून ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेबाबत आयोजित पत्रकार परिषद जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उदद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे हे उपस्थित होते आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राव्दारे 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना आपल्या महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा वापर करुन पदवीतील कोर्सशी निगडीत कौशल्य प्रशिक्षण प्रदान करावयाचे आहे. त्यांना त्याव्दारे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणे हा शासनाचा मानस आहे. यामध्ये रोजगार/स्वयंरोजगारक्षम आभ्यासक्रमाची निवड करता येणार आहे. उमेदवारांची आवड व नोकरीची उपलब्धता आणि स्थानिक उद्योगांची गरज याचा विचार करुन अभ्यासक्रमाची निवड करण्यात आलेली आहे. सदरचे अभ्यासक्रम हे साधारणतः तिन महिन्यात पूर्ण होऊ शकणारे असून किमान 200 व कमाल 500 तास इतका कालावधीचा अभ्यासक्रम असणार आहे.
जिल्ह्यातील परभणी तालुक्यात - ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी, धर्मापुरी, ग्रामीण आयडीआय, धर्मापुरी, दुर्गामाता इन्सीट्युट ऑफ फार्मसी, धर्मापुरी, ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सीग, धर्मापुरी महाविद्यालय पूर्णा तालुक्यात स्वातंत्र्य सैनीक सुर्यभानजी पवार महाविदयालय, पूर्णा, श्री सिध्देश्वर वरीष्ठ महाविद्यालय पूर्णा, कडूजी पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, धनगर टाकळी, मानवत तालुक्यात - श्री गणेश रामचंद्र कत्रुवार महाविद्यालय, मानवत, पालम तालुक्यात ग्रामीण आयटीआय सर्फराजपुर, पालम, जिंतुर तालुक्यात श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर बीसीए व बीसीएस महाविद्यालय, जिंतुर, गंगाखेड तालुक्यात सेलु तालुक्यात स्व. कल्पना चावला कला व विज्ञान महिला वरिष्ठ महाविद्यालय, गंगाखेड, सेलू तालुक्यात कृषी महाविद्यालय, सेलू, गुरु गंगाभारती महाविद्यालय, सेलु, पाथरी तालुक्यात स्व. नितीन महाविद्यालय, पाथरी या महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सदर महाविद्यालयात कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम विदयार्थ्यांना शिकविले जाणार आहेत. यात प्रामुख्याने ग्राफीक डिझायनर, पारंपारिक हस्तकला, फार्मसी संबंधी कोर्सेस, सौंदर्यतज्ञ, कृषी विषयक अभ्यासक्रम आदींसह विविध कोर्सचा समावेश असणार आहे......
0 टिप्पण्या