🌟परभणी महानगरपालिका हद्दीत 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम.....!


🌟मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांची माहिती : शहरात राबवली स्वच्छता मोहिम🌟

परभणी (दि.24 सप्टेंबर 2024) : परभणी महानगरपालिका हद्दीत 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशिल जाधव यांनी दिली.

               या उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत  शहरातील प्रभाग समिती निहाय स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. ही मोहिम महानगरपालिका व ‘आपली परभणी स्वच्छ परभणी’, हॉकर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे, सोमनाथ बनसोडे, प्रज्ञावंत कांबळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सदर मोहिमेचे नेतृत्व केले. या मोहिमेत ‘आपली परभणी स्वच्छ परभणी’ ग्रुपचे सदस्य, हॉकर्स असोसिएशनचे सदस्य महानगरपालिकेतील मुख्य लेखापरीक्षक श्रीरंग भुतडा, सहाय्यक आयुक्त बबन तडवी, शहर अभियंता वसीम पठाण, आरोग्य अधिकारी कल्पना सावंत, सर्व अभियंत्ये सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक तसेच महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनियसत कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला. या मोहिमेत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे सहभागी झाले होते.

             स्वच्छता ही नियमित व सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम राबवणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजचे हे अभियान घेण्यात आले आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होणे व लोकांनी स्वच्छते करिता  सजग करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. नागरीकांनी स्वतःच स्वच्छता दूत बनून आपले घर आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर होईल व महानगरपालिकेला आपले सहकार्य होईल असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले.

* या ठिकाणी राबविली स्वच्छता मोहिम :- 

           शहरातील जिंतूर रस्त्यावरील जूनी जिल्हा परिषद, जाम नाका ते गणपती चौक, विसावा कॉर्नर, गंगाखेड नाका ते देवाशिष पेट्रोलपंप, वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळा ते शिवशक्ती बिल्डींग ते खानापूर फाटा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन मार्गे बस स्थानक या परिसरात ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

* निर्माल्य संकलनाचे स्वतंत्र नियोजन :-

              गणेश उत्सवाच्या काळात निर्माण होणार्‍या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. तसेच नागरीकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करुनच घंटागाडीत टाकावा, कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले असून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून शहरात अद्याप पर्यंत स्वच्छ न झालेली ठिकाणे स्वच्छ करणे बाबतचे नियोजन ही महानगरपालिकेने केले आहे, अशी माहिती दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या