🌟महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना🌟
परभणी (दि.19 सप्टेंबर 2024) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 10 हजार 691 बँक खात्यावर 33.39 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरीत 127 पात्र शेतक-यांनाही प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचा लाभ घेता येणार असून, या शेतक-यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहकार पणन व वस्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. प्रोअयो 0622/प्र.क्र. 72/2-स दि.29 जुलै 2022 नुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व ग्रामीण बँकेमार्फत 41 हजार 509 कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, आजपर्यंत त्यापैकी 11 हजार 330 खात्यांना विशिष्ट क्रमांक पोर्टलवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी 11 हजार 203 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले असून, 10 हजार 691 शेतक-यांना प्रोत्साहनपर 33.39 कोटी रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी महा-आयटीने आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी ती केली नाही. अशा पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे लघुसंदेश पाठविण्यात आले. या संबंधित बँकांनीही लाभार्थी शेतक-यांना व्यक्तीशः कळविण्याबाबत संबंधित बँकांना कळविले आहे. योजनेंतर्गत पात्र परंतु, आधार प्रमाणीकरण न केलेल्या 127 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी केले आहे...
0 टिप्पण्या