🌟एसएफआय आणि डीवायएफआय ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने पीपल्स कॉलेजात क्रांतीकारी अभिवादन सभा संपन्न🌟
नांदेड : नांदेड येथील पिंपल्स कॉलेज येथे आज दि. 28 सप्टेंबर 2024 रोज एसएफआय आणि डिवायएफआय या विद्यार्थी आणि युवक संघटनेच्या वतीने शहीद कॉम्रेड भगतसिंग यांच्या 117 व्या जयंती निमित्त अभिवादन सभा घेऊन क्रांतीकारी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक टीम ने क्रांतिकारी गीत म्हणून सुरुवात केली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी प्रतिमेला अभिवादन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ. प्रफुल्ल कऊडकर ह्यांनी केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. श्याम सरोदे(DYFI ता. निमंत्रक नांदेड)ह्यांनी केली.
भगतसिंग यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ.आदिनाथ इंगोले,कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ. लक्ष्मण शिंदे(सायन्स कॉलेज चे प्राचार्य), कॉ.उज्वला पडलवार (CITU) च्या राज्य साचिव,कॉ.नसीर शेख,DYFI चे राज्य सहसचिव, कॉ. डिगांबर घायाळे ह्या प्रमुख पाहुण्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित कॉ.मीना आरसे(SFI)जिल्हा सचिव नांदेड,कॉ. स्वप्निल बुक्तरे, कॉ. यश घुले, कॉ. जयराज गायकवाड,कॉ. केतन देशमुख,कॉ. विशाल आडे, कॉ. प्रबुद्ध काळे, कॉ. जय येंगडे, कॉ. विजय सरोदे, कॉ. सुरज सरोदे, कॉ. सुबोध कंधारे, कॉ. मंगेश देवकांबळे, कॉ.नेहा कऊडकर, त्रिभुवन,प्रबुद्ध काळे, धरती महाजन, प्रदीप महाजन, जयराज, यश येंगडे व सर्व पीपल्स कॉलेज चे उपस्थित होते......
0 टिप्पण्या