🌟शेतकऱ्यांच्या विकासासाठी व अडचणीसाठी शक्य ती मदत केव्हाही करण्यास आपण तत्पर - आंचल गोयल
परभणी :- परभणी जिल्ह्यातील जिज्ञासू व प्रगतीशिल शेतकऱ्यांचा एक गट नागपूर येथे अभ्यास दौऱ्यावर गेला असताना तेथील पूर्वाश्रमीच्या परभणी जिल्हाधिकारी तथा नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त आंचल गोयल यांनी या शेतकऱ्यांना सर्वोतरी मदत केली त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांच्याशी शेती विकासाबाबत चर्चा करून मोलाचे मार्गदर्शनही केले.
नुकताच परभणी येथील पारदेश्वर प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नागपूर जिल्ह्यातील प्रगतिशील, उपक्रमशील, विक्रमी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतीवर झाला. नागपूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी दिलीप ठाकरे, शेतीनिष्ठ नारायण लांबट, जिजामाता पुरस्कार प्राप्त मायाताई लांबट, शेतीनिष्ठ अशोक काटोडे यांच्या शेतावर भेटी देण्यात आल्या. याशिवाय चंद्रपूर येथील कांचनी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयालाही भेट दिली. या अभ्यास दौNयात परभणीच्या पारदेश्वर प्रोड्युसर कंपनीचे प्रगतशील शेतकरी रामेश्वर साबळे, जनार्धन आवरगंड, प्रकाश हरकळ, गोविंद बोचरे, श्याम रेंगे, वैâलास साबळे त्र्यंबक गणगे, राजेंद्र ढोकर, संतोष मगर, बबलू ढोकर आदींचा सहभाग होता. या अभ्यास दौऱ्यात त्यांना खुप काही पहायला व शिकायला मिळाले. पुर्वाश्रमीच्या परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या परभणीतील शेतकऱ्यांचा नागपुरातील रवी भवनामध्ये पाहुणचार व सर्व व्यवस्था केली होती. तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी व अडचणीसाठी शक्य ती मदत केव्हाही करण्यास आपण तत्पर आहोत, असे आश्वासन आंचल गोयल यांनी दिले....
0 टिप्पण्या