🌟अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे यांनी निवेदनाद्वारे केली🌟
परभणी :- शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने वेळेत सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे यांनी केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत अपंग, निराधार व वयोवृध्द शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. योजनांचे पैसे काढण्याकरीता सहा सहा तास बँकेबाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे. लांबलचक रांगेत उभे रहावे लागत आहे. या गोष्टीचा काही दलालांनी पुरेपूर फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरु केला असून बँक कर्मचारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत, असे जिल्हाध्यक्ष डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे नमूद केले. वयोवृध्द लाभार्थ्यांना, खातेदारांना वेळेवर सुविधा देणे बँकेस बंधनकारक आहे. बँकेस त्या गोष्टी शक्य नसल्यास अन्य बँकांकडे किंवा हव्या असणार्या बँकांकडे लाभार्थ्यांचे ते पैसे वळते करावेत, असे या शिष्टमंडळाने म्हटले. या शिष्टमंडळात रामदास पवार, अनंता गिरी, अनिल रेंगे, ओम मुदीराज, राजे निलावार, मनोज वाटोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या