🌟प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्था अमरावती विभागातून सलग तिसऱ्यांदा प्रथम....!

                                                 


                              

🌟ग्राहकांची मुंगसाजी महाराज संस्थे प्रति असलेली विश्वासार्हता हेच पुरस्काराचे खरे फलित - दिपक देशमाने                                  

 ✍️ मोहन चौकेकर 

                                                                                      चिखली :  बँकिंग क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रात ग्राहकांना बदलत्या काळानुसार  अत्याधुनिक डिजिटल सेवा उपलब्ध करून देत, संस्थेच्या सर्व सभासद तथा  ग्राहकांच्या विश्वासाला सार्थ करत, अविरत, विश्वासपूर्ण  सेवा देऊन ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराबाबत चोख कामगिरी करणाऱ्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेने सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार मिळवून सहकार क्षेत्रात सुवर्णाक्षराने आपल्या नावाचा ठसा तिसऱ्यांदा उमटवला आहे. अमरावती विभागातून सलग तीन वेळा प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार मिळविणारी ही एकमेव संस्था ठरल्याने ही संस्थेसाठी गौरवास्पद तथा अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे

         मुंगसाजी महाराज पतसंस्थेच्या या दैदिप्यमान प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर असणारे संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखानिहाय सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी भागधारक, ग्राहक व संस्थेप्रती जिव्हाळा असणारे संस्थेचे सर्व हितचिंतक यांचा सिहाचा वाटा असल्याने खऱ्या अर्थाने हे सर्व या पुरस्काराचे मानकरी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष  दिपक देशमाने यांनी व्यक्त केल्या.संस्था आर्थिक क्षेत्राला बळकटी देत, मागील २१ वर्षापासून संस्था आपल्या कार्यपद्धती मध्ये सातत्याने सातत्त्याने बदल करत संस्थेच्या ग्राहकांना अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा कशा प्रकारे देता येईल त्यामध्ये याचा विचार करत्ताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने सुरु करत QR कोड पेमेंट प्रणाली, दैनंदिन व्यवहारामध्ये पारदर्शकता आणतांना SMS बँकिंग प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. कोअर बँकिंग प्रणाली सुरु करून H२H कुठल्याही बँकेतून पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची सुविधा सुरु केलेली आहे. मोबाईल APP सुरु करून प्रत्यक्ष संस्थेमार्फत सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार घरबसल्या करता येत आहे. IMPS, NEFT, तसेच RTGS या सुविधा सुरु करून सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यामध्ये सुलभता निर्माण केलेली आहे. 

           ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व अत्यंत कमी कालावधीत नावलौकिक मिळविणारी सर्व आधुनिक बैंकिंग डिजिटल सेवा देणारी  श्री मुंगसाजी महाराज पतसंस्था अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्काराची खऱ्या अर्थाने संस्था मानकरी आहे.राज्यामधील पतसंस्थेची पुरस्कारासाठी निवड करतांना विभागीय स्तरावर कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि अमरावती विभाग यामधून निवड करण्यात येते. यासाठी असलेले सर्व निकष पूर्ण करीत, ग्राहकांची बदलती गरज ओळखत तत्परतेने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला अमरावती विभागातील पाच जिल्ह्यामधून सलग तिसर्यांदा अव्वल दर्जा प्राप्त करून बुलडाणा जिल्ह्याचा सहकार क्षेत्रामध्ये मनाचा तुरा रोवला आहे.

             मागील २१ वर्षामध्ये संस्थेचा आर्थिकदृष्ट्या प्रगतीचा आलेख उंचावत काही वर्षामध्ये संस्थेने झपाट्याने प्रगती केलेली आहे. संस्थेची दिवसागणिक वाढत चाललेला प्रगतीचा आलेख, वाढती लोकप्रियता संस्थेची जनसामान्यांच्या प्रति असलेली तळमळ, समाजाचा भाग म्हणून, महिलांच्या आर्थिक, सामाजिक शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी असलेली तळमळ व त्यांच्या साठी करत असलेले कार्य यामुळे आत्मनिर्भर होण्यासाठी संस्थेचे असलेले योगदान, संस्थेचे अध्यक्ष  दिपकभाऊ देशमाने यांची समाजातील   अतिशय सामान्य व समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या  विकासासाठीची संस्थेच्या माध्यमातून  विकासात्मक कार्य  करण्याची पद्धत याची राज्य फेडरेशनने पुरस्काराच्या रुपात सलग तिसर्यांदा घेतलेली दखल हि संस्थेसाठीच काय संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी व सहकार क्षेत्रासाठी  गौरवाची बाब आहे.  पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच गोष्ठी प्रेरक ठरतात.  अशा    प्रेरणादायी श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्काराने तिसर्यांदा गौरविण्यात आले. त्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात पतसंस्थेला एक  आदरात्मक नवी ओळख मिळाली असून संस्थेच्या ग्राहकांच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे व विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थक्रांतीचे नवे धोरण अवलंबून आर्थिक उत्कर्ष कसा साधावा याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्काराने सन्मानित करतांना विशेष आनंद होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी फेडरेशन चे सन्मानीय अध्यक्ष  काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले.

      मुंगसाजी महाराज पतसंस्थेच्या याच कार्याची दाखल घेत  हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटी या  ठिकाणी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्टेच्या दिपस्तंभ पुरस्कारा देशातील सर्वात मोठी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे , नवी दिल्ली येथील नॅपकॉफ चे उपाध्यक्ष,    महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवंडे मॅडम यांच्यासह पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील गणमान्य व्यक्तीच्या हस्ते अतिशय हर्षोल्हासात संपन्न झालेल्या समारंभात पुन्हा एकदा सलग तिसऱ्या वर्षीपण सन्मानित करण्यात आले मुंगसाजी महाराज  पतसंस्थेच्या या दैदिप्यमान प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर असणारे संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखानिहाय सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी भागधारक, ग्राहक व संस्थेप्रती जिव्हाळा असणारे संस्थेचे सर्व हितचिंतक यांचा सिहाचा वाटा असल्याने खऱ्या अर्थाने हे सर्व या पुरस्काराचे मानकरी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष दिपकभाऊ  देशमाने यांनी व्यक्त केले.

मुंगसाजी महाराज संस्थेचा आजरोजी संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आपल्या शाखेंचा विस्तार असून  त्यामध्ये १. साखरखेर्डा, २. उंद्री, ३. राऊतवाडी चिखली, ४. पेठ, ५. दे. माळी, ६. सिदखेड राजा, ७.  मेहकर, ८. एकलारा, ९. जानेफळ, १०. सुलतानपूर, ११. वर्दडी १२. देऊळगाव राजा १३. किनगाव राजा १४ बीबी १५ कळंबेश्वर १६. देऊळगाव मही १७. डोणगाव अशा संस्थेच्या सतरा  शाखा  अतिशय चांगल्या प्रकारे नफ्यात चालू आहे. लवकरच संस्थेच्या आणखी काही शाखा जनसेवेत कार्यान्वित होणार आहे. आपल्या शाखेंचा विस्तार करतांना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आधुनिक अर्थक्रांती द्वारे आर्थिक क्षेत्राला बळकटी देण्याचे काम संस्था करत आहे. त्यादृस्टीने  संस्थेने चिखली शहरामध्ये  व संस्थेच्या अन्य शाखेवर  बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला असून, जवळपास ५०० च्या वर बचत गटांना कर्ज वाटप केलेले आहे. त्या योगाने अनेक महिला व पुरुष बचत गटांमार्फत दुग्द्जन्य व अन्य लहानमोठे उद्योग सुरु करून  आपली आर्थिक उन्नती साधत असल्याचे  प्रतिपादन यावेळी संस्थाध्यक्ष  दिपकभाऊ देशमाने यांनी व्यक्त केले.

संस्थेच्या वतीने अध्यक्ष  दिपकभाऊ देशमाने , संचालक  कन्हैयालाल भोजवानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दीपस्तंभपुरस्कार वितरण कार्यक्रमाला जागृती महिला अर्बंनच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई देशमाने, सौ गीताताई भोजवानी  उपस्थित होत्या संस्थेचे उपाध्यक्ष   मुरलीधर सुरजमल अग्रवाल,  पुंडलीकबापू राऊत,  अनिल भीमराव देशमुख, आनंद पुरुषोत्तमआप्पा बोंद्रे,  विजय लक्ष्मण जागृत, अभय जगन्नाथ तायडे,  खालीदखॉ उस्मानखॉ,  प्रकाश गणपत निकाळजे, सौ उषा दिलीप चवरे यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  दिपकभाऊ  देशमाने यांनी यांनी आभार व्यक्त केले......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या