🌟गंगाखेड विधानसभा निरिक्षक पदावर निवड झाल्याबद्दल ग्रंथी यांचा शहिद स.उधमसिंघ फाऊंडेशन व मित्र परिवाराकडून सत्कार🌟
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पवित्र सचखंड हुजूर साहीब अबचल नगर गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य तथा जेष्ठ समाजसेवी सरदार जसपालसिंघजी लांगरी तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक पत्रकार तथा समाजसेवी व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे सचिव सरदार रविंदरसिंघजी मोदी, सरदार जगजीतसिंघजी खालसा,प्रदिप भैया जोगदंड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर या सत्कार सोहळ्याचे आयोजन शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष चौधरी दिनेश (रणजित) व समस्त मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांची गंगाखेड विधानसभा निरिक्षक पदावर फेर निवड झाल्याबद्दल त्याचा शाल/शिरोपावसह पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जेष्ठ साहित्यिक पत्रकार तथा समाजसेवी स.रविंदरसिंघ मोदी यांनी स.मनबीरसिंघ ग्रंथी यांच्या सामाजिक/राजकीय क्षेत्रातील जनहीतवादी कार्याचे कौतुक केले........
0 टिप्पण्या