🌟जिंतूर तालुक्याला विकासनिधी वाटपातून डावलल्याच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा....!


🌟तालुकाप्रमुख ॲड.सुनिल बुधवंत यांनी पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे पाठवला आपल्या पदाचा राजीनामा🌟

परभणी/जिंतूर :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याला विकासनिधी वाटपातून डावलल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे जिंतूर तालुका प्रमुख अ‍ॅड.सुनिल बुधवंत यांनी रविवार दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

            या संदर्भात माहिती देण्याकरीता बुधवंत यांनी रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिंतूर तालुक्यात पक्ष वाढीसाठी गावोगावी, खेडोपाडी, तांडा वस्तीत बुथ बांधणी पासून ते शाखा स्थापन करेपर्यंत भरपूर कार्य करून आपण पक्ष बांधणी केली. परंतु एकाही पदाधिकार्‍याला तालुक्यात रस्ते, नाल्या, सभामंडप, वीज, आरोग्य, उद्योग इत्यादी जनसुविधेची कार्य करण्यासाठी विकास निधी प्राप्त झाला नाही, अशी खंत बुधवंत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच या तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय, प्रशासकीय समित्यांवर एकाही शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली नाही. या सर्व बाबींच्या निषेधार्थ आपण तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे नमूद करीत पक्षाचे सचिव संजय मोरे यांना आपण राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे, असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या