🌟यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूण्याचे संस्थेचे सचिव मधूकर भास्करे यांनी पुष्पहाराने स्वागत केले🌟
नांदेड़ :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्तप्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर संचालित निवासी मूकबधिर विद्यालय उल्हासनगर नांदेड़ येथे पालक मेळावा व 25 विद्यार्थीना मान्यवराच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आला.
15 ऑगस्ट रोज सकाळी 8:05 वा शाळेचे संस्थापक श्री मधूकर भास्करे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर पालक मेळावा व शाळेतील 25 मूकबधीर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले सुप्रसिध्द डॉक्टर डॉ. श्याम दवणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी नगरसेवक दिपक पाटील,पत्रकार नरेश तुप्तेवार, के. के. पठाण सर , सुधाकर सरोदे सर, आर.आर. भास्करे सर, मनोहर भास्करे सर ,बहुजन समाज पार्टिचे दिंगबरराव ढोले, डॉ. इंगळे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूण्याचे संस्थेचे सचिव मधूकर भास्करे यांनी पुष्पहाराने स्वागत केले. मूकबधीर विद्यार्थ्यांना संस्थेकडुन पुरविण्यात आलेल्या शैक्षणिक व भौतिक सुविधांचे मान्यवरांनी कौतुक केले व संस्थेच्या कार्याबद्ल समाधान व्यक्त केले सरोदे सर यांनी मार्गदर्शन करतांना पालक, समाज तसेच शाळेतील कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी विषयी मत व्यक्त केले तर आर. आर. भास्करे सर यांनी संस्थाचालकांच्या अडचणी मांडल्या. सुसज्य दोन मजली इमारतीमध्ये विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक ग्रुप हिंअरिंग एड, स्पीच ट्रेनर, विशिष्ठ प्रकारच्या टेबल, शैक्षणिकसह खेळाचे साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या निवासासाठी गादी, पंलगची सोय मुलीसाठी स्वातंत्र्य व्यवस्था मेहनती कर्मचारी वर्गा बरोबरच व सर्व भौतिक सुविधा संस्थेने पुरविल्याबद्ल संस्थेचे उत्कुष्ट कामकाज बघुन सर्व मान्यवर आंनदी झाले. के. के. पठाण यांनी भास्करे सरांनी चालवलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बी.एस.पी.चे प्रदेश सचिव दिगंबरराव ढोले यांनी शाळेस ईनव्हेटर स्वरुपात देणगी देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन एस.पी. सर यांनी केले. अध्यक्ष डॉ. श्याम दवणे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर पडवळ एच.डी.सर यांनी पाहुण्याचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमावेळी बहुसंख्येने पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान भास्करे सर, अरुन चव्हाण सर, शाहु सर, बालाजी कंदुलवार,बाबु यरगलवार, विलास कांबळे, श्रीधर सोनतोडे यांनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या