🌟अक्षदा मंगल कार्यालय येथे काही युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने उपोसथ धम्मदिवस शिबिराचे आयोजन केले होते🌟
हिंगोली : येथे वर्षावासानिमित्त युवकांनी पुढाकार घेऊन पहिल्यांदा च ऐक दिवशीय उपोसथ धम्मदिन शिबिराचे आयोजन भंते नापावल पंयातीस महासत्तावीर (श्रीलंका)व भंते पंयावर्धन हिंगोली यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले होते.या उपोसथ धम्मदिवस शिबिरात शिबिरात २७० साधकांनी सहभाग नोंदविला होता.
हिंगोली येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे काही युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने उपोसथ धम्मदिवस शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात श्रीलंका येथील भंते नापावल पंयातीस महासत्तावीर व भंते पंयावर्धन हिंगोली यांनी वर्षावास कालावधीचे महत्त्व तसेच दर महिन्याला येणाऱ्या दोन अष्टमी, पौर्णिमा व अमावस्या अशा चारही दिवशी अष्टशील का धारण करावे त्याचे नियम व अष्टशील म्हणजे काय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अष्टशिलाचे पालन केवळ बौद्ध धर्मियांनीच न करता सर्व धर्मीयांनी त्याचे पालन केल्यास सर्वांचे जीवन सुखी समाधानी होते असे सांगितले. अष्टशील म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्राणीमात्राची हत्या न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, दारू व अन्य नशील्या पदार्थाचे सेवन न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, दिवसातून एकदाच बारा वाजेच्या आत जेवण करणे, मनोरंजन व करमणुकीचे साधना पासून दूर राहणे, सौंदर्य प्रसाधन व किमती अलंकारापासून दूर राहणे, उच्च असणावर बसणे,झोपणे टाळून केवळ जमिनीवरच राहावे. असे साधे अष्टशिलाचे नियम आहेत असे स्पष्ट करून सांगितले.
बौद्ध उपासकांनी किमान महिन्यातील उपोसताच्या चार दिवशी याचे पालन करावे अशी शपथ यावेळी भंतेजीनी दिली तसेच सहभागी शिबिरार्थी कडुन संपुर्ण दिवस अष्टशिलाचे पालन व विपश्यना ध्यानधारणा करून घेतली या एकदिवसीय शिबिरात युवकांनी सहभागी झालेल्या सर्व २७० उपासकांच्या भोजन,फराळ व चहापानाची व्यवस्था स्वखर्चातून केली होती. अशा प्रकारचे हे नाविन्यपूर्ण शिबिर हिंगोलीत पहिल्यांदाच आयोजित केले होते. आयोजकांचा विशेष सत्कार प्रकाश इंगोले व दैवतबाई उचित यांनी शिबिरार्थींच्या वतीने केला,शिबिर यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी सुनील आंंभोरे, इंजी धनंजय भगत, शांतीरत्न थोरात, कुलदीप कांबळे, ऐड.सुनील कांबळे, मनिष कवाणे, संदिप डोंगरे आणि त्या परिसरातील युवक व महिलांनी परिश्रम घेतले....
0 टिप्पण्या