🌟महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) स्वायत्त संस्थेच्या वतीने करण्यात आले होते मार्गदर्शन शिबीराचे आयोजन🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील महावीर नगर परिसरातील शनि मंदिर सभागृहात शनिवारी दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) या स्वायत्त संस्थेच्या वतीने मार्गदर्शन शिबीर व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी अमृत स्वायत्व संस्थेच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्याचा लाभ घ्या असे आवाहन भुषण धर्माधिकारी यांनी केले. यावेळी संस्थेचे वक्ते भूषण धर्माधिकारी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अनंत जोगदंड, अभिजित चक्के, भास्कर भाले, सुभाषचंद्र ओझा, लक्ष्मीकांत कदम, प्रभाकर कोत्तावार, प्रविण कोत्तावार, वसंत पांपटवार, रमण ओझा, सतीश टाकळकर, नरेश पुणपाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भूषण धर्माधिकारी म्हणाले, खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल ( EWS ) जे तरुण व तरुणी आहेत यांना स्वयंरोजगार, कृषी उद्योग प्रशिक्षण, ड्रोण प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम, संगणक, टंकलेखन, लघुलेखन, किशोरी विकास प्रकल्प, वैयक्तिक कर्ज, परशुराम गट, व्याज परतावा योजना साठी अमृत संस्था मदतीसाठी तयार आहे. महाराष्ट्रातील अमृत संस्थेचे अनेक लाभार्थी मोठ्या स्वाभिमानाने व्यवसाय करीत आहे. ज्यांना परशुराम गटामध्ये बचत गटामार्फत व्यवसाय करावयाचा असेल यांनाही अमृत संस्था मदत करण्यास तयार आहे.उद्योग व्यवसाय करताना आपल्याला बँकेमार्फत कर्ज घ्यावे लागणार असून त्याच्या परतफेडसाठी जे व्याज होईल.त्या व्याजाची रक्कम (१२% ) पर्यंत अमृत संस्था देणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून लक्षित समाजाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी अमृत लक्षित गटातील गणमान्य व्यक्ती व लाभार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक दीपक यांनी केले सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनंत जोगदंड यांनी केले......
0 टिप्पण्या