🌟महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.....!


🌟भिमशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे केली मागणी🌟

परभणी :- काल दिनांक 26/08/2024 रोजी प्रकाश आंबेडकर नगर,धार रोड परभणी येथे आराध्या परमेश्वर शेळके या 5 वर्षीय मुलीचा महावितरणच्या खांबावरील विद्युत तार तुटून त्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.


  सदरील घटना महावितरणच्या फुज कॉल सेंटर 2 मधील असून वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकर नगरातील नागरीकांनी आमच्या वस्तीवरील विद्युत तार काढाव्यात सदरील तार या झाडामध्ये अडकलेल्या असून त्यांच्या वजनाने तार लोम्बकाळत आहेत व या लोम्बलेल्या तर हानीकारक आहेत त्यामुळे वस्तीच्या समोरच्या बाजूने पोल उभे करून त्या समोरच्या बाजूने टाकण्यात याव्यात असे सांगून देखील येथील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तसेच नगरातील नागरीकांनी लेखी अर्ज करून देखील याकडे लक्ष दिले नाही सदरील तार गेल्या 25 ते 30 वर्षाखाली टाकलेल्या आहेत  या तार बदलून दुसऱ्या टाकण्याची गरज आहे की नाही याची तपासणी देखील करण्यात आलेली नाही त्यामुळे सदरील घटना ही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे घडली असून असे लोकांच्या जीवाशी खेळणार्या महावितरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याच बरोबर भविष्यात आशा घटना होऊ नये यासाठी शहरातील वस्तीवरून गेलेल्या विद्युत तार या वस्तीच्या बाजूने टाकण्यात याव्यात अन्यथा भीमशक्ती सामाजीक संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालया समोर वीजवितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशा आशयाचे निवेदन मा.पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, सरचिटणीस रवी सोनकांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, महासचिव प्रा.प्रवीण कणकुटे, जिल्हाप्रमुख सतीश भिसे, तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे, शहराध्यक्ष विक्रम काळे, बबन वाव्हळे, दीपक कणकुटे, परमेश्वर शेळके, प्रवीण हजारे, गणपतराव शेळके, संजय वाव्हळे, आकाश शिंदे, सुरेश यादव आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या