🌟परभणीत आयोजित कै.सौ.वत्सलाबाई राके बुध्दीबळ स्पर्धेत विशाल राऊत प्रथम...!


🌟तर या बुध्दीबळ स्पर्धेत मंदार बिल्पे ठरला उपविजेता🌟

 परभणी (दि.05 ऑगस्ट 2024) : परभणीत आयोजित कै.सौ. राके स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत विशाल राऊत यांनी प्रथम तर मंदार बिल्पे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

           परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात काल रविवार दि.04 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 27 वी कै. सौ. वत्सलाबाई राके स्मृती बुद्धिबळ स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली. या  स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमधून एकूण 140 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.  अत्यंत चुरशीच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आनंद देशमुख यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरणाचा कार्यक्रम डॉ. डॉक्टर अनिल दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी अनिल शेलगावकर, धनराज कांकरिया, प्रीतम अबोटी, दीपक राऊत, रवींद्र पंडित, हितेश उपाध्याय यांची उपस्थिती होती स्पर्धा संयोजनाचे कार्य संघटनेचे सचिव अनिल शेलगावकर यांनी अत्यंत यशस्वीपणे संपन्न केले त्यांना संघटनेचे कोषाध्यक्ष आनंद देशमुख, डॉ. अनिल दिवाण, दीपक राऊत यांची अत्यंत मोलाची साथ लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ खेळाडूंनी आणि बाल खेळाडूंच्या पालकांनी मोलाचे सहकार्य केले.

             या स्पर्धेत खुला गटात अनुक्रमे विशाल राऊत, मंदार बिल्पे, रितेश काऊतकर, तेजस बोथीकर (सर्व रा.परभणी), दिनकर हंबर्डे (नांदेड) व आदित्य चिंचोलकर यांनी क्रमांक पटकाविला. 9 वर्षाखालील खेळाडूंचा गटात निशांत कावडे, स्वरा काळे, शौर्या मुप्पानेनी, देवांश चव्हाण, रुंद्रांश होट्टे, निमिश हिवरे, स्तवन जैन (प्रोत्साहनपर) तर 12 वर्षाखालील खेळाडूंच्या गटात, आदित्य गायकवाड, प्रवीण देशमुख, आयर्न सोनवणे, सुजीव भंवर, सर्वेश भिसे, सोहम वाघमारे. 15 वर्षाखालील खेळाडूंच्या गटात सानिध्य वाघमारे, करुण्या वाघळे, प्रथमेश सुतार, देव फालके, स्वराज यादव, दत्ता जाधव. तर महिला खेळाडूंच्या गटात भूमिका वाघळे, अनुष्का चव्हाण, अर्चना सोनवणे, भक्ती गवळी, मंगला मूरक्या, हिंदवी यादव आणि रिया पंडीत यांचा समावेश आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या