🌟नांदेड येथील गुरूद्वारा परिसर व अबचलनगर मधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर उपाययोजना करा.....!


🌟महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री जाधव व कार्यकारी अभियंता श्री राख यांच्या सोबत शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा🌟

🌟गुरूद्वारा परिसर व अबचलनगर मधील विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर लवकरच करणार उपाययोजना🌟 

नांदेड (दि.१९ ऑगस्ट २०२४) :- गुरूद्वारा परिसर व अबचलनगर च्या वारंवार सतत लाईट बंद  होण्याचे प्रकार गेल्या वर्षों पासून चालू असल्याने व जेव्हा लाईट बंद पडल्या नंतर कॉल सेंटर फोन उचलत नाही व कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क होत नाही, या बाबतीत कोणतीही पुर्व सुचना देण्यात येत नसल्याने. नागरीकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून गुरूद्वारा परिसर व अबचलनगर मधील सर्व नागरिकांनी मिळून महावितरण कंपनी ला शेकडो लोकांच्या सह्या घेऊन दि 19 ऑगस्ट सोमवारी  अधिक्षक अभियंता विद्युत भवन ला शिख समाजाच्या शिष्टमंडळाने भेटुन समस्या चे निवारण करण्यासाठी निवेदन दिले आहे. या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा होऊन फेब्रुवारी पर्यंत सर्व समस्या चे निवारण करण्याचे व उद्दा पासुनच या समस्या दूर करण्यासाठी काम करण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता श्री जाधव सरांनी शिष्टमंडळास दिले. या बाबतीत सविस्तर माहिती म्हणजे  गुरतागद्दी विकास करण्यासाठी गुरूद्वारा परिसरातील लोकांच्या जमिनी अधिग्रहित करून अबचलनगर कॉलनी स्थापन करण्यात आली होती. तसेच जागतिक महत्त्व असलेल्या गुरूद्वारऱ्या च्या आजु बाजु चा परिसरात सुशोभित करून येणाऱ्या यात्रे करूना त्रास होऊ नये व गुरूद्वाऱ्याच्या  पाठ पुजेत व्यत्यय येऊ नये म्हणून गुरूद्वारा बोर्ड ची गुरु ग्रंथ साहीब जी भवन च्या बाजुची जमीन अधिग्रहण करून महावितरण कंपनी ला दीले.त्या ठिकाणी फक्त गुरूद्वारा परिसर व अबचलनगर करीता सब स्टेशन निर्माण करून चोवीस तास अखंडित वीजपुरवठा सुरळीत चालू राहील असे आश्वासन दिले होते. सध्या या भागातील परिस्थिती वर नजर टाकल्यास  गुरूतागद्दी च्या वेळी येथील लोक संख्या पाहून जे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले होते आज ही तेवढेच ट्रान्सफॉर्मर आहेत परंतु लोकसंख्या मध्ये भरमसाट वाढ होऊन ही व गुरूद्वाऱ्याची अनेक नवीन यात्री निवास बांधले गेले  व लोड प्रचंड प्रमाणात वाढल्या नंतर सुध्दा  विद्युत ट्रान्सफॉर्मर ची संख्या वाढविण्यात आली नाही. उलट याच ट्रान्सफॉर्मर वर दुसऱ्या भागातील  केळी मार्केट व चौफाळा भागाचा लोड याच फिडर वरती टाकण्यात आले. तसेच जागोजागी विद्दुत तारा लोमकळणें, विद्युत ताराना झाडांचा स्पर्श होणे, जिकडे तिकडे विद्युत तारांवर बेल व रोपटे चे राज्य प्रस्थापित झालेले आहे. तसेच मुख्य वीज पुरवठा होणाऱ्या तारांचा एक मेकांना मिळून स्फोट होऊन चिंनगाऱ्या पडणे हे नित्य क्रम झालेला आहे.  लाईन स्टाफ काम करण्यासाठी आले असता मोबाईल व्हॅन नसल्याने तारां वरील बेल व झाडांच्या फांद्या कापण्यासाठी असमर्थता दर्शवतात. या मुळे काही वर्षांपूर्वी चिखलवाडीत जशी दुर्घटना होऊन प्राणहानी झाली होती ही पुनरावृत्ती होणार नाही याची शाश्वती देता येत नाही. कारण मुख्य वीज तारांच्या खालील सुरक्षा तारां गायब झालेले आहेत. तसे माननीय बावनकुळे साहेबांनी जेव्हा ते उर्जा मंत्री असताना कुसुम सभागृहात जनता दरबार मध्ये या बाबतीत अधिकाऱ्यांना कडक शब्दात गुरूद्वारा भागाला त्रास होऊ नये म्हणून सुचना केल्या होत्या. परंतु थोडे दिवस व्यवस्थित झाल्या नंतर जैसे थे परिस्थिती आहे. म्हणून या भागातील नागरीकानीं  शंभर च्या वर लोकांच्या स्वाक्षरी ने निवेदन तयार करून अधिक्षक अभियंता विद्युत भवन ला नागरिकांचे प्रतिनीधी मंडळ  भेटून निवेदन दीले. त्याची एक प्रत माननीय जिल्हाधिकारी नांदेड व मा आमदार मोहनराव हंबर्डे जी दक्षिण यांना ही देण्यात आले आहे.....या शिष्टमंडळात स राजेंद्र सिंघ पुजारी माजी मेंबर गुरूद्वारा बोर्ड,स कश्मिर सिंघ भट्टी, स सुखदेव सिंघ रोडगी,स जसबीर सिंघ धुपिया,स जगदीप सिंघ नबंरदार , स हरभजन सिंघ पुजारी,स बचितर सिंघ सुखमणी,स राजेंद्र सिंघ शाहू यांची उपस्थिती होती.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या