🌟नामांतर हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलताना ते म्हणाले🌟
नांदेड (दि.०६ ऑगस्ट २०२४) :- आंबेडकरवाद्यांच्या राजकीय अस्तित्वाच काय ? असा जाहीर सवाल कामगार, कष्टकरी नेते मा.अरुण गाडे यांनी नामांतर शाहिद हुतात्मा दिनी केले मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद नामांतर शाहिद पोचिराम कांबळे व जनार्धन मावडे यांच्या स्मृतिदिना निमित्त हॉटेल ताज पाटील येथे आयोजित अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नामांतर हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी मा.आर.बी.मांदळे हे होते.यावेळी अरुण गाडे (नागपूर) डॉ.संजय अपरांती (नासिक) मारोती साळवे (औरंगाबाद) अरविंद सोनटक्के (मुंबई) माधव जमदाडे,दिगंबर मोरे, प्रा.अशोक ढोले,भीमराव भुरे, चंद्रकांत ठाणेकर,प्रा.विलास भालेराव (:लातूर )प्रा,प्रल्हाद इंगोले,प्रा.राजू सोनसळे, शत्रुघ्न जाधव (हिंगोली) अनंत भवरे (औरंगाबाद)इजी.विवेक मावडे यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद येथील मराठावडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे,असा ठराव २७ जुलै १९७८ रोजी झाला.आणि जनार्धन मावडे व पोचिराम कांबळे यांची निर्घृण हत्या झाली,मराठवाड्यात दंगल सुरु झाली या मागणीसाठी अनेकांना हुतात्मा व्हावं लागलं, अनेक घरांची राख रांगोळी झाली आणि १७ वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावडा विद्यापीठ असा नाम विस्तार १४ जानेवारी १९९४ रोजी झाला.नामांतर हुतात्मा जनार्धन मावडे व पोचिराम कांबळे यांची हत्या ४ ऑगस्ट १९७८ रोजी झाली तो दिवस शाहिद दिन म्हणून नामांतर हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने साजरा केला जातो.
आज झालेल्या अभिवादन सभेस नामांतर हुतात्मा समितीचे श्याम निलंगेकर, यशवंत थोरात,विजय राजभोज,जयकुमार डोईबळे,दीपक पवळे,शिवाजी गोडबोले,प्रकाश वाघमारे, गंगाधर झिझाडे,प्रकाश तारू,जि.पी.मिसले,डी.डी. भालेराव,आर.सी.कांबळे टी.पी,वाघमारे,भीमराव धनंजकर,राजकुमार सिंदगीकर,गणपत गायकवाड,कोंडीबा वासाटे,देविदास भिसे,डॉ. विजयकुमार माहुरे.अतिश ढगे सम्यक खोसले,लालबा घायाळ,ऍड.के.पी.सोमवंशी, किरण जोंधळे,मनोहर भास्करे,ईश्वर सावंत,विठ्ठल भाटापूरकर,राजाराम गजभारे,डी.टी.हणमंते,अनिल कासराळीकर,नामदेव ढवळे, अनिल लोणे,आम्रपाली शेळकीकर,रामचंद्र पवार, माधव गोडले,बाबासाहेब गोडबोले,गौतम खिराडे, प्रेमदास घुले,राजू कदम, अरविंद घुले,एम. एन.सोनकांबळे,मुरलीधर सोनकांबळे,देविदास भिसे,भूषण पंडित, अशोक गोडबोले,अविनाश नाईक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अभि.भरत कुमार कानींदे,काकासाहेब डावरे,प्रा, प्रल्हाद इंगोले,ऋषिकेश निलंगेकर यांनी प्रयत्न केले......
0 टिप्पण्या