🌟पुर्णेतील रेल्वे इन्स्टिट्यूट निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियनचा दणदणीत विजय....!


🌟मजदूर युनियनचे नेचे नेते बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनलचा एकतर्फी विजय🌟 


पूर्णा,प्रतिनिधी/

         पूर्णा येथील रेल्वे इन्स्टिट्यूट या कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियन या संघटनेची एक हाती सत्ता आली आहे मागील दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत विजयी झालेले एम्प्लॉईज संघ या संघटनेला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे .पूर्णा हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत रेल्वे इन्स्टिट्यूट ही संस्था रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत आहे दिनांक 28 ऑगस्ट रोजी या ठिकाणी द्विवार्षिक निवडणूक संपन्न झाली यंदाच्या निवडणुकीत रेल्वे मजदूर युनियन या संघटनेचे नेते बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडून आले एम्प्लॉयी संघ या मागील सत्ताधारी संस्थेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले बाळू गायकवाड यांनी सचिव पदासाठी 125 मतांनी सचिन गायकवाड यांचा पराभव केला. बाळू उर्फ तुळशीराम निवृत्ती गायकवाड यांना 290 तर सचिन गायकवाड यांना 165 मते मिळाली सहसचिव पदासाठी राजू भिसे हे विजयी झाले त्यांनी महादेव शिंदे यांचा 67 मतांनी पराभव केला तर कोषाध्यक्षपदी शैलेश विश्वकर्मा विजयी झाले त्यांना 169 तर पराभूत उमेदवार शेख शरीफ यांना 127 मते मिळाली.  विश्वकर्मा हे 32 मतानी विजय झाले. मजदूर युनियन या विजयी पक्षाकडून सदस्य पदी दीपक अहिरे(276),दीपक नागोराव (270) अमीर आली( 252),जॉन अजय (235),शिवा प्रसाद (223) हे उमेदवार विजयी झाले.तर एम्प्लॉयी संघ या संघटनेचे काळे तुकाराम प्रकाश (198) हे विजयी झाले.तर पराभूत उमेदवारांमध्ये सागर नागोराव अहिरे(195), विजयकुमार बुद्धे (178) ,अमोल दवणे (171), चित्र सेन कुरे (179),निलेश तुपे (180 )यांचा  पराभव झाला. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पूर्णा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ वसमत हिंगोली वाशिम अकोला व लहान मोठ्या रेल्वे स्टेशनचे सभासद असलेले रेल्वे कर्मचारी मतदानासाठी आले होते मागील वेळी एम्प्लॉईज संघाचे कांचन ठाकूर यांनी एक हाती सत्ता मिळवली होती त्यांनी 25 वर्ष सत्तेत असलेल्या मजदूर युनियनचा पराभव केला होता परंतु यावेळी कांचन ठाकूर यांची जादू चालली नाही या निवडणुकीत मजदूर युनियन या संघटनेचे अनेक पदाधिकारी निवडणुकीत कार्यरत होते मागील दोन वर्षांपूर्वी रेल्वे इन्स्टिट्यूट या संस्थेचे सचिव असलेले तुळशीराम निवृत्ती गायकवाड उर्फ बाळू गायकवाड यांनी दोन वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली,दिवसभर मतदान झाल्यानंतर सायंकाळी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली रात्री उशिरा मतमोजणी संपन्न झाली यावेळी दोन्ही बाजूचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीत या दोन प्रमुख संघटने शिवाय रेल्वेच्या अनुसूचित जाती जमाती एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेकडून तीन उमेदवार उभे होते. यामध्ये साईनाथ चित्ते, विशांत जाधव,भाऊसाहेब रंधे हे पराभूत झाले याशिवाय मुंबई या भागात असणारी रेल्वे मजदुर युनियन  निवडणुकीत पराभूत झाली त्यांच्या सहाही उमेदवारांना 50 पेक्षा कमी मते मिळाली स्वतंत्र उभे असलेले रवी धोंडी दुशिंगे व समद बेग लाला यांचाही या निवडणुकीत पराभव झाला मतमोजणी नंतर पहाटे तीन वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले.

        या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदेड येथील रेल्वे अधिकारी एन. एम. दुर्गाप्रसाद व त्यांचे सहकारी म्हणून एस. एस.राऊत प्रा.एस.एन.धोपे व तांदळे सर यांनी सहकार्य केले याप्रसंगी अतितटीच्या लढतीमध्ये कोणाचा पराभव होईल हे सांगणे शक्य नव्हते यासाठी आरपीएफ विभागाचे इन्स्पेक्टर नरसिम्हाराव व पूर्णा स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व गोपनीय शाखेचे कर्मचारी कोठार,भीमराव मगरे,भगवानराव वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी नांदेड रेल्वे विभागाचे मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी मनिकुमार,प्रशांत वाघमारे, टी.के.खंदारे, कॉ.अशोक व्ही.कांबळे,संजयकुमार इंगळे, मुकदम राजू खंदारे ई.पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या