🌟पुर्णा येथील बुद्ध विहारात स्वतंत्र दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे करण्यात आले ध्वजारोहण.....!


🌟यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती🌟 


पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहारातील भदंत उपाली थेरो ग्रंथालय व वाचनालय या ठिकाणी 78 व्या भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त सकाळी 08.30 वाजेच्या सुमारास अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष व भदंत उपाली थेरो ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो व भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व पूर्णा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  उत्तमराव कदम ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या हस्ते  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

 ध्वजारोहणा अगोदर बुद्ध विहारांमध्ये  तथागत भगवान बुद्ध व राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष  उत्तम भैया खंदारे  नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड पत्रकार विजय बगाटे श्रीकांत हिवाळे  इंजिनीयर पीजी रणवीर दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे टी झेड कांबळे  अमृत मोरे वारा काळे गुरुजी एम यु. खंदारे  ज्ञानोबा जोंधळे मुंजाजी गायकवाड व पूर्णा  शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

 बुद्ध विहार समितीच्या वतीने  मान्यवरांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व उपस्थितांना अल्पोपहार व मिठाईचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामू भालेरावअतुल गवळी  बोद्धा चार्य त्र्यंबक कांबळे  इंजिनीयर विजय खंडागळे  राहुल धबाले बाळू बरबडीकर सुरज जोंधळे आदींनी परिश्रम घेतले  ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर प्रबोधनकार विजय सातोरे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या