🌟महिलांनी सशक्त होऊन आत्मरक्षा करणे गरजेचे - रशीद मास्टर

 


🌟परभणीत महिलांसाठी मोफत दहा दिवशीय कराटे प्रशिक्षण शिबीर🌟

परभणी (दि.२७ ऑगस्ट २०२४) : सध्या महिलांवर व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असुरक्षित वातावरणात महिला जगत आहेत. त्यामुळे महिलांनी शारीरिक आणि  मानसिक स्वास्थ्य टिकवत सशक्त होवून आत्मरक्षा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कराटे प्रशिक्षक रसिक मास्टर यांनी केले.

              शहरातील डिसेंट फिटनेस सेंटर यांच्यावतीने महिलांसाठी दहा दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असूनमंगळवार 27 ऑगस्ट रोजी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कराटेचे प्रशिक्षण मास्टर गणेश कुठे, आयोध्या पवार, बाळू मास्टर मुदगलकर, पठाण, स्नेहल माने, अंजली परभणीकर आयोजक नितीन बिडकर, पलाश घाडगे, अक्षय कुलकर्णी, वैभव जावडे यांची उपस्थिती होती.

            यावेळी उपस्थित प्रशिक्षक यांनी वेगवेगळे आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. डिसेंट फिटनेस सेंटरच्या माध्यमातून 10 दिवस प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाणार आहे. सहभागी महिलांना शारीरिक व्यायामाचे विविध प्रकार तसेच शरीर सुदृढ होण्यासाठी लागणारा संतुलित आहार याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.रक्षाबंधनाच्या पार्श्‍वमीवर विशेष महिलांसाठीच शिबिर डिसेंट फिटनेस सेंटरच्यावतीने आयोजित करण्यता आले असून या प्रशिक्षण शिबिरात 150 महिलांनी सहभाग नोंदवला आहे.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले तर आभार पलाश घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक नितीन बिडकर, पलाश घाडगे, अक्षय कुलकर्णी, वैभव जावडे, सुजल उघडे यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या