🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांची जयंती साजरी......!


🌟यावेळी प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले🌟

पुर्णा (दि.०९ ऑगस्ट २०२४) :- येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात डॉ.रंगनाथन यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉ.रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल डॉ.विलास काळे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते त्याचे उदघाटन व ग्रंथालयशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भित्तीपत्रकाचे  विमोचन प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला  महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ सुरेखा भोसले, अधिसभा सदस्य प्रा डॉ विजय भोपाळे, ग्रंथपाल डॉ.विलास काळे,प्रा. डॉ.अशोक कोलंबीकर,प्रा.डॉ.त्रिमुर्ती सोमवंशी , प्रसिद्धीविभाग समन्वयक प्रा.डॉ.संजय कसाब,विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी व महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. अशोक कोलंबीकर यांनी केले तर आभार डॉ . विलास काळे यांनी मानले या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या