🌟यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद सितारामअप्पा एकलारे यांच्या हस्ते भीत्तीपत्रकाचे विमोचन🌟
पुर्णा (दि.१६ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा येथील श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ७८ व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी 'भारतीय आर्थिक विकासात विचारवंतांचे योगदान' हा विशेषांक भित्तीपत्रकाच्या माध्यमातून प्रकाशित केला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागाच्या वतीने या भित्तीपत्रकाचे विमोचन हे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद सितारामअप्पा एकलारे,संस्थेचे सचिव अमृतराजजी कदम,सहसचिव प्रा.गोविंदराव कदम , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .राजकुमार ,उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे आणि डॉ.गजानन कुरुंदकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी अर्थशास्त्र विभागातील प्रा. बालाजी आसुरे, प्रा. डॉ. वर्षा धुतमल आणि महाविद्यालयातील प्रो. डॉ. पी. व्ही.भुताळे, प्रो.डॉ.रवी बरडे, प्रा. डॉ. विजय पवार, प्रा. शेख फातिमा, डॉ.वृषाली आंबटकर,प्रा.डॉ. रेखा पाटील, डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ. संदीप शिंदे , प्रा. इडोळे, प्रा. हुसना, प्रा.जयश्री स्वामी, प्रा.उषा मगरे आणि डॉ. ओंकार चिंचोले यांची उपस्थिती होती.यावेळी बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु.निकिता कदम या विद्यार्थिनींनी भारतीय आर्थिक विचारवंताचे जीवन आणि आर्थिक विकासातील योगदान इत्यादी कार्याचा आढावा घेतला . भारतीय आर्थिक विकासातील योगदानात दादाभाई नवरोजी महात्मा फुले ,राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण ,अमर्त्य सेन , अभिजीत बॅनर्जी या महान आर्थिक विचारवंतांनी भारतीय आर्थिक विकासात मोठे व महत्त्वपूर्ण योगदान दिले. सदरील भित्तीपत्रक प्रकाशित करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ.कुलदीप कदम, प्रा. बालाजी आसुरे आणि प्रा.डॉ.वर्षा धुतमल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी कु. निकीता कदम, या विद्यार्थीनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले......
0 टिप्पण्या