🌟आमदार श्वेता महाले यांच्यातर्फे विदर्भातील सर्वांत मोठ्या दहीहंडीचे आज चिखलीमध्ये आयोजन.....!


🌟सैराट फेम आर्ची उर्फ रिंकु राजगुरु व बॉलीवुड स्टार झरीन खान यांची विशेष उपस्थिती🌟 


✍️ मोहन चौकेकर 

चिखली : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चिखली शहरात मंगळवार 27 ऑगष्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने भाजपा युवा मोर्चा व महायुती तर्फे विकासाची दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक मिरा सेलीब्रेशन येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार श्वेता ताई महाले यांच्या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या भाजपा युवा मोर्चा तर्फे आयोजित या दहीहंडीचे विशेष आकर्षण सैराट चित्रपट फिल्म आर्ची रिंकू राजगुरू आणि बॉलीवूड सिने अभिनेत्री जरीन खान या उपस्थित राहणार आहेत.

                                          मागील दोन वर्षापासून गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढत हजारो नागरीक, महिला, युवक, युवती व गोंविदा पथकाच्या उपस्थितीत स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात या महायुतीच्या विकासाच्या दहीहंडीचे आयोजन भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात येत असते. तर मागील वर्षी सुमारे 35 हजारांचे वर या ठिकाणी नागरीक उपस्थित होते.  याहीवर्षी देखील भव्य दिव्य विकासाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात विशेषत:  महिला, युवतींसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था असणार आहे. तसेच  बाहेर गावचे  अनेक गोविंदा पथक या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन आमदार श्वेताताई महाले व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या