🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी धुरपताबाई जल्हारे यांची निवड.....!


🌟पूर्वीच्या उपसरपंच शेख मन्नाबी शेख ईनायकतुला यांचे निधन झाल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायतींपैकी १५ सदस्यांची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ताडकळस येथील रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक झाली या बैठकीत उपसरपंच म्हणून धुरपताबाई रेश्माजी जल्हारे यांची निवड करण्यात आली. 

पूर्वीचे उपसरपंच शेख मन्नाबी शेख ईनायकतुला यांचे निधन झाल्यामुळे येथील उपसरपंच पद रिक्त झाले होते.या पदाच्या निवडीसाठी तहसील कार्यालयाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. उपसरपंचाच्या रिक्त पदासाठी बालासाहेब दिगंबर राव अंबोरे तसेच धुरपताबाई रेश्माजी जल्हारे  या दोघांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. एकुण १५ पैकी १ सदस्य काही कारणास्तव गैरहजर असल्यामुळे १३ सदस्य उपस्थित होते. या मतदान प्रक्रियेत धुरपताबाई जल्हारे यांना १० तर बालासाहेब आंबोरे यांना ३ ग्रामपंचायत सदस्यांची मते पडल्याने उपसरपंच म्हणून धुरपताबाई जल्हारे यांची निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांनी घोषित केले.यावेळी धुरपताबाई जल्हारे यांना सरपंच गजानन आंबोरे पाटील,सौ.संपदा अंबोरे,सौ.शितल दिपक आंबोरे,सौ.छाया सुरेश मगरे,भगवान लाकडे,ज्ञानोबा घोडके,सौ.योगेश्वरी गजानन आळणे, धुरपताबाई जल्हारे, खंडेराव वावरे,बबलू माने असे एकूण १० मते पदली तर बालासाहेब आंबोरे यांना सौ.केसरबाई वामनराव मोहिते,सौ.प्रभावतीबाई दिलीप आंबोरे, बालासाहेब आंबोरे हे तीन मते पडली. निवड झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या