🌟परभणीतील सावली विश्रामगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमाबाई व नात जावई प्रो.डॉ.आनंद तेलतुंबडे यांचा सत्कार...!


🌟भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिणचे मा.जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟


परभणी (दि.१९ ऑगस्ट २०२४) :- भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नात आदरणीय रमाबाई व त्यांचे नात जावई तथा सुप्रसिद्ध विचारवंत आदरणीय प्रोफेसर डॉ.आनंद तेलतुंबडे यांचे भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचे निष्ठावान पाइक शामराव जोगदंड यांनी रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी परभणीतील सावली विश्राम गृहावर सदिच्छा भेट घेऊन उभयतांचे शाल पुष्पहार व पेढे देऊन यथोचित सन्मान केला.

आदरणीय रमाबाई व आदरणीय डॉ.आनंद तेलतुंबडे भारसावडा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले होते थोडी विश्रांती व फ्रेश होण्यासाठी ते सावली विश्रामगृह या ठिकाणी थांबले होते त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी व समता सैनिक दलाच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या