🌟नवीन आधार कार्ड काढण्यास व आधार कार्ड दुरुस्तीसाठी आलेल्या अबालवृद्ध महिला नागरीकांना आडमुठ भाषेचा वापर🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील पोस्ट ऑफिस मधील आधार केंद्र ऑपरेटरच्या मनमणी कारभारामुळे शहरातील अबालवृद्ध महिला व नागरिक अक्षवरशः त्रस्त झाले असून नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी आलेल्या अबालवृद्ध महिलांसह अपंग तसेच नागरिकांना अक्षरशः आडमुठ् भाषेचा वापर करीत विविध कारणांवर कारणं दाखवून संबंधित आधार कार्ड ऑपरेटर कडून चप्पला झिजेपर्यंत फिरवल्या जात असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी संबंधित आधार केंद्र ऑपरेटर विरोधात कठोरात कठोर कारवाई करुन नागरीकांना योग्य न्याय देईल काय ? असा प्रश्न आता उपस्थित होत असून संबंधित आधार केंद्राचा अडमुठ ऑपरेटर प्रत्येकाशी अरेरावीची भाषा बोलतो, आधार कार्ड काढण्याच्या वेळेत सर्रास कॉन्टर बंद असते अन् कदाचित आधार केंद्र चालू असले तरी संबंधित ऑपरेटर ऑन ड्युटी असतांना देखील आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी आले असता मला घरी जायचे आहे आता आधार कार्ड काढने बंड आहे असे म्हणून हाकलून लावतो नियमाप्रमाणे आधार कार्ड काढण्याची वेळ सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० असतांना देखील नमूद वेळेत आधार केंद्र ऑपरेटर कधीच उपलब्ध नसतो त्यामुळे नागरिकांना चक्करावर चक्करा माराव्या लागतात त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करतील काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.........
0 टिप्पण्या