🌟शिवसेना (शिदे) पक्षाकडून प्रेषित मोहम्मद पैंगबरांचा अवमान करणाऱ्या रामगिरी महाराजांचे समर्थनाच्या निषेधार्थ राजिनामा...!


🌟पुर्णा नगर परिषदेचे मा.नगर सेवक विरेश कसबेंनी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खाँन यांच्याकडे दिला राजीनामा🌟 

पुर्णा (दि.२१ ऑगस्ट २०२४) :- मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर साहेब यांच्या बद्दल बेताल व्यक्तव्य करणारे रामगिरी महाराज यांचे आपल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केल्याने मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद करीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक विरेश भोजराज कसबे यांनी शिवसेना अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्याकडे आज बुधवार दि.२१ ऑगस्ट रोजी आपला राजीनामा पाठवला आहे.


शिवसेना मा.नगरसेवक विरेश कसबे यांनी पाठवलेल्या राजीनामा पत्रात असं नमूद केलं आहे की संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर असून त्यांच्यावर रामगीरी महाराज यांनी अतिशय बेताल वाक्य वापरल्याने मुरलीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मी पक्षाचा एकनिष्ट पदाधिकारी म्हणून काम करीत होतो परंतु ज्या रामगीरी महाराजांनी मुस्लिम धर्माच्या पैंगबरां विषयी अपशब्द वापरले त्यांना पक्षाचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंचावर जाऊन पाठींबा दिल्यामुळे पक्षात राहाणे मला योग्य वाटत नसल्याने मी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पूर्णा नगर परिषदचा मा.नगरसेवक या पदाचा राजीनामा देत आहे. देशात भाईचारा कायम राहावा म्हणून योग्य तो न्याय निर्णय घ्यावा लागला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या