🌟पुर्णा बंदला व्यापारी बांधवांनी दिला स्वयंस्फूर्तीने १००% प्रतिसाद : सकल हिंदू समाजाने दिले तहसिलदारांना निवेदन🌟
पुर्णा (दि.१७ ऑगस्ट २०) :- बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर कट्टरपंथी दहशतवादी प्रवृत्तीकडून सातत्याने होत असलेल्या अमानवीय अमानुष अत्याचारांच्या घटनांच्या विरोधात आज शनिवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुर्णा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या बंदला व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपआपली प्रतिष्ठान बंद ठेवून १००% प्रतिसाद दिला.
सकल हिंदू समाजाकडून आयोजित आजच्या बंद मध्ये शहरातील सराफा दुकानदार,किराणा दुकानदार,कापड दुकानदार,हार्डवेअर दुकानदार,आडत व्यापारी,हॉटेल/पानपट्टी चालक,फळ/भाजीपाला विक्रेते तसेच फोटो स्टुडिओ चालक,टेलर आदींसह विविध व्यावसायिकांनी सहभाग नोंदवल्याने शहरातील सराफा बाजार,छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ), महात्मा बसवेश्वर चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,स्वामी दयानंद सरस्वती चौक,लोकमान्य टिळक रोड,महाविर चौक,नगर परिषद परिसर,रेल्वे स्थानक परिसर,बसस्थानक परिसर,शाहिद स्व.राजाभाऊ बरदाळे भाजी मार्केट व्यापारी संकुल परिसर जुना मोंढा परिसर,मा.राष्ट्रपती स्व.एपीजे अब्दुल कलाम चौक (झिरो टी पॉईंट),आदी परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
दरम्यान बांगलादेशात तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाज बांधवांसह माता-भगिनींवर कट्टरपंथी हिंसक राक्षसी प्रवृत्तींकडून होत असलेल्या अमानवीय क्रूर अत्याचारांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधवांसह विविध सामाजिक/धार्मिक संघटनांनी एकत्रित येऊन पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांना शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निवेदन दिले या बंदमध्ये सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे व सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता.....
0 टिप्पण्या