🌟पुर्णेतील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभागाकडून आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्या म्हणाल्या🌟
पुर्णा : पुर्णा शहरातील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात काल दि 05 ऑगस्ट 2024 रोजी महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन सीमा चव्हाण यांनी केले. विविध कला कौशल्याच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येतात त्यासाठी काळाला अनुरूप कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी केले ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंद कदम होते तसेच प्रमुख उपस्थिती श्रीमती सीमा चव्हाण आणि श्रीमती ठाकूर यांची होती.
विद्यार्थिनींनी स्वतःमधील कलागुणांना वाव देत कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर बनावे विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनींना तसेच महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी असल्याचे यावेळी विचार मांडले तसेच श्रीमती ठाकूर यांनी विद्यार्थिनींना शिवण कला , ब्युटी पार्लर ,मेहंदी अशा विविध कोर्सेसची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुष्पा गंगासागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ .पल्लवी चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ जि. एस पुल्ले, डॉ .अलका कौसडीकर,श्री गजानन भालेराव यांची उपस्थिती होती तसेच 70 विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभाग घेतला....
0 टिप्पण्या