🌟महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ना.तहसिलदार रविंद्र राठोड यांचा विभागिय स्तरावर प्रशस्तीपत्र देवून होणार गौरव...!


🌟स्वातंञ्यदिनी दि.१५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या एका मोठ्या समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार🌟

फुलचंद भगत

मंगरुळपीर :- मंगरुळपीर तालुक्याचे प्रभारी तहसिलदार हे आपल्या ऊत्कृष्ट कार्यशैलीने ओळखले जातात.पारदर्शन प्रशासनप्रणाली प्रशासन सुरळीत आणी योग्य रितीने चालवुन प्रशासनाची प्रतिमा शासन आणी जनता यांचेमध्ये ऊंचावुन कार्य केल्यामुळे कर्तव्यतत्पर ना.तहसिलदार म्हणून रविंद्र राठोड यांची विभागीय स्तरातुन पुरस्कारासाठी निवड झाली असुन स्वातंञ्यदिनी त्यांना गौरविन्यात येणार आहे.

            प्रशासन चालवण्याचा हातखंडा आणी जनतेची जुळलेली नाळ याचा समन्वय साधुन प्रशासकीय कामकाज सुरळीत करणारे ना.तहसिलदार रविंद्र राठोड यांना गौरविण्यात येणार आहे.दि.१५ ऑगस्ट 2024 रोजी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणा- या अधिकारी/कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव / सन्मान करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे विवरण पत्रासह प्रस्ताव मागविण्यात आलेले होते.प्राप्त झालेल्या प्रस्तावाची शासनाने नेमून दिलेल्या पुरस्कार निवड समिती मार्फत सर्व प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. तसेच छाननी अंति अमरावती विभागातून उत्कृष्ट अधिकारी मंगरुळपीर येथील कर्तव्यदक्ष ना.तहसिलदार रविंद्र राठोड निवड करण्यात आलेली आहे.स्वातंञ्यदिनी दि.१५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या एका मोठ्या समारंभात त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने सर्वञ कौतुकाचा वर्षाव होत आहे.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या