🌟पत्रकारांच्या लिखाण स्वातंत्र्यवर गदा आणणारे अतिशय वादग्रस्त 'ब्रॉडकास्ट' विधेयक अखेर सरकारने घेतले मागे.....!


🌟मराठी पत्रकार परिषद व देशभरातील तमाम पत्रकार संघटनांच्या दबावामुळे सरकार नरमले🌟

 🌟पत्रकारांच्या लिखाण स्वातंत्र्यवर गदा आणणारे व अतिशय  वादग्रस्त ठरलेले ब्रॉडकास्ट केंद्र सरकारने घेतले मागे🌟

✍️ मोहन चौकेकर                       

पत्रकारांच्या लिखाण स्वातंत्र्यवर गदा आणणारे व अतिशय वादग्रस्त ठरलेले ब्रॉडकास्ट विधेयक आज केंद्र सरकारने मागे घेतले सरकारचे हे विधेयक डिजिटल ब्रॉडकास्टर आणि इंडिव्हिज्युअल कॉन्टेट क्रिएटर्सचा आवाज बंद करणार होते. विधेयकातील अनेक तरतुदी डिजिटल मिडियाचा गळा घोटणारऱ्या असल्याने देशभरातील तमाम पत्रकार संघटनां व देशभरातील लाखो पत्रकारांनी या विधेयकास तीव्र विरोध केला होता.


अखिल  भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं देखील विधेयकास विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता.. तसे पत्र माहिती मंत्र्यांना पाठविले होते.. अखेर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे सर्वांशी चर्चा करून या विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात येईल असे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे.. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारच्या भूमिकेचं स्वागत करतानाच माध्यम स्वातंत्र्यावर अंकुश आणण्याचा कोणताही प्रयत्न देशातील पत्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

डिजिटल मिडिया सरकार विरोधात असल्याचे आणि जनतेचा नव्या माध्यमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर डिजिटलवर अंकुश आणण्यासाठी नवे विधेयक आणले गेले होते.. मात्र माध्यमांना अंगावर घेऊन चालणार नाही याची जाणीव झाल्यानं सरकारला अखेर माघार घ्यावी लागली आहे......

✍️ मोहन चौकेकर

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद 

बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या