🌟महिला उन्नती संस्थेच्या 'महाराष्ट्र प्रभारी' पदी ज्येष्ठ पत्रकार,मदन (बापू) कोल्हे....!


🌟महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल मदन (बापूं)चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे🌟

परभणी - 'शिक्षित नारी - सशक्त नारी' चे घोष वाक्य घेऊन राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ' महिला उन्नती संस्थे 'च्या ' महाराष्ट्र प्रभारी ' पदी, परभणी येथील जेष्ठ पत्रकार,मदन(बापू) कोल्हे यांची, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राहुल वर्मा यांनी नियुक्ती केली आहे.

देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात ही ' महिला उन्नती संस्थे ' चे कार्य वाढवण्यासाठी, गेली 53 वर्षापासून ,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रांमध्ये विद्यार्थी जीवनापासून समाजसेवी व  पत्रकारांच्या विविध संघटनाद्वारे निस्वार्थीपणे कार्य करत असलेले,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल ' इरा 'चे महाराष्ट्र अध्यक्ष , धर्मभूमी चे संपादक , जेष्ठ पत्रकार, मदन (बापु) कोल्हे यांच्या प्रदीर्घ कालावधीच्या अनुभवाचा लाभ , महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन सक्षमीकरणासाठी तसेच महिला उन्नती संस्थेला महाराष्ट्रात चालना मिळावी म्हणून संस्थेच्या पुनर्बांधणी मध्ये मराठवाडा विभाग अध्यक्ष असलेल्या, मदन (बापू ) कोल्हे यांचेवर ' महिला उन्नती संस्थे ' च्या ' महाराष्ट्र प्रभारी ' पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे .सध्या श्रीदेवी पाटील अध्यक्ष असलेल्या महिला उन्नती संस्थेच्या महाराष्ट्र पदावरील प्रभारी पदावरील संजय कुमार कोटीच्या यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचे रिक्त जागेवर मदनबापू फुले यांची नेमणूक करून, संघटना मजबुतीकरणाबरोबर महिला सशक्तीकरणाच्या कार्याला गती मिळेल या अपेक्षेसह राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राहुल वर्मा यांनी मदन(बापु) कोल्हे यांचे अभिनंदन करुन त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत . महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल मदन (बापूं)चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या