🌟दर्जेदार व मोफत सुविधेमुळे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ🌟
फुलचंद भगत
वाशिम :- सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच यावर्षी सततचा पाऊस,वातावरणातील बदल ,कधी गर्मी कधी पाऊस एकूणच वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. एरवी दर पावसाळ्यात दैनंदिन बाह्यरुग्ण संख्या जी ४००-४५० राहायची ती यावर्षी ६००-६५० आहे त्यातच मागच्या ३-४ दिवसात ही रूग्नसंख्या ७०० पार झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात नोंदणी पासून सर्व सुविधा जसे प्रयोगशाळा तपासणी, क्ष किरण आणि औषधी सुध्दा अगदी मोफत उपलब्ध आहे. चालू महिन्यात रुग्णालयात क्षयरोगाचे ५ , डेंग्यू चे ४ , टायफॉइड चे १०० , अतिसार चे जवळपास ८० रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आला आहे.
खाजगी दवाखान्यात ज्या प्रयोगशाळा तपासणीसाठी ३०० ते ४०० रुपये लागतात अशा सर्व तपासण्या (सी बी सी) इथे मोफत होत आहेत...रक्तशय चे उपचार बाहेर दीड ते दोन हजार रुपयात होतात त्याचे इंजेक्शन पण अगदी मोफत आहे सोबतच आता श्वानदंश साठी लागणाऱ्या इंजेक्शन ए आर एस साठी संदर्भित करायची गरज नाही कारण हे इंजेक्शन जे की जवळपास दोन ते अडीच हजाराचे आहे ते पण रुग्णालयात उपलब्ध आहे. इ सी जी काढण्या साठी बाहेर ३०० रुपये लागतात ती सुविधा २४ तास अगदी मोफत उपलब्ध आहे. या सोबतच बाह्यरुग्ण साठी लागणारा औषध साठा पण मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तसेच रुग्णालयीन स्वच्छता व रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सौजण्यपूर्ण वागणूक दिली जाते. यामुळे मंगरूळपीर शहर व ग्रामीण भागातील सर्वांनी या सर्व मोफत सुविधांचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या