🌟मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा येथील ई क्लास जमीनीवरच्या अवैध ऊत्खनन विषयाला कलाटनी.....!

🌟'ते'म्हणतात आम्ही मुरुम टाकलाच नाही : तहसिलदाराने दिले चौकशीचे आदेश,कारवाईकडे जिल्हाचे लागले लक्ष🌟


फुलचंद भगत

वाशिम :- मंगरुळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतने अवैधपणे ई क्लास जागेतल्या शेततळ्यातुन अंदाजे ४० ब्रास मुरुम गावठाणातील खड्डे बुजवण्यासाठी टाकला व त्या मुरुमाची कोणतीही परवानगी नसल्याचा लेखी अहवाल सबंधित तलाठ्याने तहसिलदार यांचेकडे सादर केल्यानंतर प्रकरणी चौकशीचे आदेश निघाले.परंतु आम्ही तो मुरुम टाकलाच नाही असा लेखी जबाब तेथील ग्रामसेवकाने दिल्यानंतर आता या विषयाला कलाटनी मिळाली आहे.जर ग्रा.पं.ने मुरुम टाकला नाही तर तो आला कुठुन याविषयी सखोल चौकशीचे आदेश तलाठी आणी मंडळ अधिकार्‍यांना तहसिलदार यांनी दिले आहेत.

              ई क्लास जमीनीमधुन अवैध उत्खनन झाल्याबाबत तलाठी यांनी अहवाल दिनांक ०२/०८/२०२४ सादर केला होता त्यानुसार ग्राम पंचायत त-हाळा यांचा जबाब दिनांक ०६/०७/२०२४ रोजी नोंदवन्यात आला तलाठी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार मौजे त-हाळा येथील गट क्र १७३ मध्ये ९.३० हेआर जमीनीवर राज्य पर्यटन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या शेत तळयालगत ईक्लास जमीनीवरुन अंदाजे ४० ब्रास मुरुम ग्राम पंचायत कार्यालयाकडून गावठाणामधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आणला गेला असुन त्याबाबत ग्राम पंचायत सचिव यांना चौकशी केली असता त्याबाबत चलान किंवा परवानगी सादर केली नाही.

सदर प्रकरणात सचिव ग्राम पंचायत यांना त्यांचे म्हणने सादर करण्यासाठी बोलावण्यात आले असता त्यांनी सादर केलेल्या जबाबानुसार मौजे त-हाळा येथील ग्राम पंचायत ने कोणतेही खड्डे बुजविण्यासाठी मुरुम टाकलेला नाही असा जबाब सादर केलेला आहे सदर प्रकरणात तलाठ्याने सादर केलेल्या अहवालानुसार सदर मुरुम ग्राम पंचायत अंतर्गत उत्खनन करुन टाकण्यात आल्याचे नमुद केलेले आहे. त्यामुळे शासनाची दिशाभुल केल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात आपण समक्ष पाहणी केलेली आहे काय, आपण पाहणी केली असता त-हाळा येथे मुरुम टाकल्याचे आपणास निदर्शनास आलेले आहे काय त्याबाबत आपणाकडे छायाचीत्र आहेत काय, मुरुम टाकलेल्या ठिकाणी आपण गावातील ग्रामस्थांचे जबाब नोंदविलेले आहे किंवा कसे .तसेच आपण गौण खनिज उत्खननाची खात्री न करता अहवाल सादर केलेला आहे काय ?

या सर्व मुद्याबाबत आपला लेखी खुलासा तात्काळ सादर करावा असे सबंधित तलाठ्याला तहसिलदार यांनी आदेश दिले आहेत.मंडळ अधिकार्‍यांनाही याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी पुढे काय कारवाई महसुल विभागाकडुन केल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*काय होता अवैध ऊत्खननाबाबत तलाठ्याचा अहवाल*

मंगरूळपीर तालुक्यातील तर्‍हाळा ग्रामपंचायतकडुन गावठाणातील रस्त्यावरील खड्डे बुजविन्यासाठी मुरुम हा ई क्लास जागेतुन आणल्या गेला असुन यासंदर्भात तलाठ्याने ग्रा.पं.कार्यालयाकडे विचारणा केली असता ग्रा.पं.कडुन कोणतीही परवानगी तसेच चलान सादर केल्या गेली नाही.सदर मुरुम हा ग्रा.पं.कार्यालयाकडुन अवैधपणे ई क्लास जागेतुन म्हणजेच सुरु असलेल्या शेततळ्यातुन ४० ब्रास मुरुम अवैधपणे आणल्याचा अहवाल तलाठ्याने तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या