परभणी शहरातील पंचशील चौक परिसरात राहणार्या भटके विमुक्त समाजातील एक अल्पवयीन मुलगी क्लासला जात असतांना दि.22 ऑगस्ट 2024 रोजी रईस शेख या युवकाने छेडछाड करीत विनयभंग केला. याबद्दल तिचे वडील रईस शेख या युवकाला विचारपूस करायला गेले असता तेथील जमावाने त्यांच्यावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले, असे नमूद करीत या शिष्टमंडळाने पोलिसांनी अजून त्या मुलीच्या वडिलांची तक्रार दाखल करून घेतली नाही, असे म्हटले. रईस शेख याच्याविरुद्ध एफआरआर दाखल करून त्याला अटक केली. मात्र त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अद्याप पकडलेले नाही, असे निदर्शनास आणून दिले. रईस शेख याने आपल्या हाताने शरिरावर घाव करून स्वतः दवाखान्यामध्ये भरती झाला आहे. त्याची खोटी तक्रार दाखल करून घेतल्या जाऊ नये. भटके विमुक्त समाजातील पिडीत कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. पोलिसांनी ताबडतोब आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई करावी व मुलीच्या वडिलांंवर चाकूने हल्ला व मारहाण करणार्या अन्य आरोपीना सुद्धा तातडीने अटक करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
निवेदनावर भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे, उपाध्यक्ष उध्दवराव काळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, बीड विभाग संयोजक उमेश जोगी, जिल्हा संयोजक हनुमानसिंग कच्छवे, जिल्हा अभियान प्रभारी लक्ष्मण सोनवणे, मानवत तालुका संयोजक आकाश शर्मा, परतुर तालुका संयोजक विष्णु गिरी, वैदु समाजाचे परभणी अध्यक्ष श्रावण देशमुख आदींच्या सह्या आहेत. दरम्यान, डॉ.केदार खटींग यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून या मागणीचे निवेदन दिले. यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते......
0 टिप्पण्या