🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील विश्वदीप प्रतिष्ठानच्या वतीने जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे फोटो वाटप...!


🌟कार्यक्रमास ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, नृसिंह महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, जिल्हा परिषद वस्तीशाळा, वडकुते महाविद्यालय असे शासकीय तसेच निमशासकीय एकूण १३ कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने विश्वदीप प्रतिष्ठान च्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

 कार्यक्रमास ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेशराव आंबोरे ,सरपंच गजानन आंबोरे, माजी सभापती रंगनाथराव भोसले, राम व्यंकटराव अंबोरे, मदन आंबोरे, मनू पाटील आंबोरे, ग्रा.पं.स. माऊली घोडके, सुरेश मगरे, खंडू वावरे, तुकाराम आळणे, शेख शहजाद,साहेबराव शिंदे, मुंजाभाऊ कुकर, संजय जलारे, नारायण तिगोटे, गजानन खंदारे, सचिन मगरे, उत्तम मलुले, रोहन तिगोटे, निखिल मगरे, सुभाष मगरे, पिंटू घोडके, सुदाम घोडके, हिरालाल जाधव ,राजू कांबळे, नंदकुमार जाधव आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या