🌟घटनास्थळावरून ५९८००० / रूपयांचा मुद्देमाल जप्त🌟
फुलचंद भगत
वाशिम :- मंगरुळपीर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांना दि.०७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०.०० वाजेच्या दरम्यान गोपणीय माहीती मिळाली की मंगरुळपीर येथील ग्राम सवाशिनी रोड चेहेलपुरा (कसाबपुरा) येथील खुल्या जागेत कत्तलीकरीता जनावरे / गोवंश निर्दयपणे बांधुन ठेवलेले आहेत. अश्या माहीतीचे आधारे तीन पोलीस पथके नेमुण मिळालेल्या गोपणीय माहीतीप्रमाणे घटनास्थळी सवाशिनी रोड चेहेलपुरा (कसाबपुरा ) मंगरूळपीर येथे मोहम्मद ईरफान मोहम्मद सलाम यांचे घराचे बाजुला खुल्या जागेत तसचे ईतर तीन ते चार ठिकाणी मोठया प्रमाणे गोवंश बांधलेले दिसुन आले.
यावेळी गोवंशाची पंचासमक्ष पाहणी केली असता सदरचे गोवंश यांना कोणत्याही प्रकारचे चारापाण्याची व्यवस्था न करता कृरतेची वागणुक देवुन निर्दयीपणे चिखलामध्ये बांधलेले दिसुन आल्याने आजुबाजुला विचारपुस केली असता कोणीही गोंवंशबाबत मालकी हक्क दाखविला नसल्याने घटनास्थळी सदरचे गोवंश गायी, बैल, कालवड, व गोरे यांची चोरी करून कत्तलीकरीता संशयास्पद बांधलेले मिळुन आल्याने पोलीसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करून ८९ जनावरांची/गोवंश्याची सुटका करून ५९८००० / (पाच लाख अठयानव हजार) रूपयांचा मुददेमाल जप्त केला. तसेच तेथील स्थानीक लोकांचे मदतीने सदर जप्त केलेले जनावरे हे सुरक्षेच्या दुष्टीने पालन पोषन करणेकामी केशव गोरक्षण सेवा समीती मोहगव्हाण ता. मंगरूळपीर येथे स्थानीक वाहनादवारे दाखल करण्यात आले असुन सदर प्रकरणामध्ये पोउपनि / दिनकर राठोड यांचे फिर्यादवरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे अपराध क्रमांक ४९५ / २०२४ कलम ३०३(२) बी. एन.एस सह कलम ५,५ अ, ५ ब, ११ अॅनीमल अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनि / शुभांगी थोरात हे करीत आहेत.
सदर कार्यवाही ही दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ ११.०० वा ते दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ०३.०० वा दरम्याण मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. भारत तांगडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती निलीमा आरज मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मंगरूळपीर ठाणेदार श्री. सुधाकर आढे, सपोनि / शुभांगी थोरात, पोउपनि / दिनकर राठोड, डी.बी.पथक पोहवा / संजय घाटोळे, पोका / अनिल दहातोंडे, पोका /जितेंद्र ठाकरे, पोकॉ / शकील मुन्नीबाले, पोलीस स्टाप पोका / समीर खान, पोकों / गजानन मेंढे, पोका /वैभव येळणे, पोका / गजानन ब्राम्हण, ट्राफिक पोलीस अंमलदार वारकड, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगरूळपीर येथे नेमणुकीस असलेले पोकों / राम राउत, पोकॉ / ईस्माईल कालीवाले, चालक सफौ / नागोराव राठोड, पोना / उमेश ठाकरे यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केली......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या