🌟मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर🌟
पुर्णा : भारत बंद च्या अवाहनाला प्रतिसाद म्हणून मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या वतीने पूर्णा येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौकात मुस्लिम बांधवानी 'धरणा आंदोलन' करण्यात आले.या ठिकाणी मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या वतीने नायब तहसिलदार यांचे द्वारे मा.द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती भारत सरकार यांना एक निवेदन पाठविण्यात आले.
त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील हिंदू धर्माचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक व महान धर्मगुरु महमद पैगंबर यांच्या बद्दल त्यांचे चरित्र हनन करणारे वक्तव्य करून देशातील मुस्लिम बांधवाच्या भावना दुखवून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांचा तीव्र निषेध करून त्यांच्यावर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली सोबतच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबद्दल घेतलेला संविधान विरोधी निकाल रद्द करण्याची ही मागणी करण्यात आली.
आवश्यक वाटल्यास लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवून सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निकाल रद्द करावा असेही नमूद करण्यात आले आहे बदलापूर (मुंबई),अकोला आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या.आणि तेथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार हतबल ठरले.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्वरित बरखास्त करावे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
शहरातील डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सुमारे अकरा वाजल्या पासून मुस्लिम समाजाने धरणे आंदोलन सुरू केले होते.या धरणे आंदोलनात रिपाईचे ज्येष्ठ नेते मा.प्रकाश कांबळे यांचेसह नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड,दादाराव पंडित,वंचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड,सुनील मगरे,राष्ट्रवादीचे नेते राजू नारायणकर,शेख खुद्दुस,अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,वीरेश कसबे,रौफ कुरेशी,इलियास चाऊस,अशोक कांबळे,ऍड.धम्मा जोंधळे आदींसह टिपू सुलतान ग्रुपचे सर्व कार्यकर्ता, मुफ्तीबिलाल साहब,मुफ्ती इजाज साहब,हाफिझ हसन,मौलाना रजा, शेख जावेद,अमजत नुरी,आखिल अहमद,अब्दुल अली अन्सारी,सय्यद अली,उलेमा पूर्णा,विजय जोंधळे,बाबा पठाण,आतिक,सय्यद कलीम,पत्रकार मुजीब,अनिस बाबुमियां आदी कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून धरणे आंदोलन यशस्वी केले.
या धरणे आंदोलनास प्रकाश कांबळे,राजु नारायनकर,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.धम्मदीप जोंधळे,अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,दादाराव पंडित,उलेमा,पूर्णा.मौलनाआदींनी मार्गदर्शन केले तर रौफ कुरेशी यांनी आभार प्रदर्शन केले.......
0 टिप्पण्या