🌟स्वातंत्रदिनाच्या निमित्याने संस्थेचे प्रतिनिधी सुगत राजकुमार सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले🌟
गंगाखेड (दि.१६ ऑगस्ट २०२४) :- गंगाखेड तालुक्यातील सुरळवडी येथील संजय गांधी आश्रमशाळेत ७८ व्या भारतीय स्वातंत्रदिनाच्या निमित्याने संस्थेचे प्रतिनिधी सुगत राजकुमार सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री.डफळ सर,मुख्याध्यापक श्री.तुपे सर,श्री.कचरे सर,श्री.साबणे सर काझी सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्व भाषणानातून व्यक्त केले.
यावेळी देशभक्ती पर गीत गायन व नृत्य विध्यार्थ्यानी सादर केले. मोठया प्रमाणात विध्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवे सर यांनी केले. अबॅकस गुरु खेडकर मॅडम यांचा सत्कार भोसले मॅडम यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंबेकर सर आकनगिरे सर भोरगीर सर भालेराव सर गोदाम सर रेड्डी सर कृष्णा मुंडे राम चव्हाण प्रकाश जंगले यांनी विशेष परिश्रम केले.....
0 टिप्पण्या