पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यांचे जीवन हे भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पर्व आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या साधारण कुटुंबातील मुलीपासून ते असाधारण शासनकर्त्या पर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास आजही प्रेरणादायी आहे. त्या प्रशासकीय कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि उज्ज्वल चारित्र्य या साठी अतुलनीय आदर्श होत्या.
त्यांची सत्ता सामाजिक सुधारणा, कृषी सुधारणा, जल व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, जन कल्याण आणि शिक्षणासाठी समर्पित होती तसेच त्यांची राजवट न्यायप्रिय होती. समाजातील सर्व घटकांना समरसतेच्या दृष्टीकोणातून सुरक्षा तसेच प्रगती साठी संधी देणे हा त्यांच्या प्रशासनाचा मुख्य आधार होता त्यांच्या याच जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने जयंतीवर्ष निमित्ताने आयोजित..!
संत जनाई ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी
"विचार यात्रा "
गंगाखेड ते चौंडी
दिनांक सोमवार १२ ऑगस्ट, मंगळवार,१३ऑगस्ट २०२४.
सदरील विचार यात्रा आयोजित करण्यात आली असून.
यात्रेचा उद्घाटन सोहळा सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिराच्या शेजारील कै. गोपीनाथराव मुंडे अन्नछत्र सभागृहामध्ये संपन्न होणार आहे ,त्यावेळी गंगाखेड शहरात शोभायात्रा देखील संपन्न होणार आहे.
* यात्रेचा मार्ग :-
परळी, आंबेजोगाई, केज, पाटोदा, जामखेड, विविध ठिकाणी प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेचा समारोप: श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी जिल्हा.बीड मांजरसुंबा येथे होणारा असून .यावेळी महाआरती, विशेष व्याख्यान व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे..
तसेच उद्घाटन सोहळ्याच्या भव्य शोभायात्रा कार्यक्रमात गंगाखेड शहर ग्रामीण व परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आयोजक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र
संपर्क: संपर्क:
९४०३३०३१९७
९४२३९४२३३७
0 टिप्पण्या