🌟डाॅ.वसंत हंकारे यांचे 'बाप आणी निसर्ग'विषयावर मंगरुळपीर येथे व्याख्यान🌟
🌟आता झाडे लावुन जगवली नाही तर भविष्यात आयुष्य धोकादायक🌟
🌟पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचा कार्यक्रमातुन सुर🌟
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था आणि निसर्ग संजीवनी फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन देवकी भवन चारभुजा मंदिर मंगरूळपीर येथे करण्यात आले.या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली.
डॉ. हंकारे यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयीची संवेदना जागवण्याचा प्रयत्न केला. अत्यंत मार्मिक पद्धतीने त्यांनी या विषयाला हात घालत, विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दल प्रेमाचे बीज अंकुरित केले.डॉ. हंकारे यांनी विद्यार्थ्यांना एक शपथ दिली."मी माझ्या आई-वडिलांविषयी नेहमी आदर बाळगीन, त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करीन आणि त्यांच्या नावाला कधीही कमीपणा येऊ देणार नाही. तसेच, मी निसर्गाच्या ह्रासास कारणीभूत होणारे कोणतेही कार्य करणार नाही. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी मी पार पाडीन.या शपथेने विद्यार्थ्यांच्या मनात आपल्यावर असलेल्या कर्तव्याची जाणीव निर्माण केली.आणि त्यांची निसर्गाबद्दलची जबाबदारी स्वीकारली. हा प्रसंग उपस्थितांच्या मनावर एक अमिट छाप सोडून गेला, आणि त्यांनी आपल्या जीवनात आई-वडिल आणि निसर्गाबद्दल अधिक प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे वचन दिले. मंगरूळपीर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अनोखे अनुभव घेतले. विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुली आज ढसाढसा रडतांना दिसल्या, जणू त्यांच्या मनातील भावना डॉ. हंकारे यांच्या शब्दांनी उलगडल्या. ज्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. त्यांनी आपल्या पालकांना कडाडून मिठ्या मारल्या, आणि डॉ. हंकारे यांनीही त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले. हॉलमध्ये उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. हे दृश्य खरोखरच भावनिक होते.कार्यक्रमास नाथ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, सिद्धार्थ विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक,व्हिएन कॉलेजचे विद्यार्थी, मनीष ठाकरे यांचे वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगरूळपीरचे प्रतिष्ठित नागरिक धनंजय वार्डेकर,गजानन भोयर,डाॅ,दिपकजी ढोके,राहुल तुपसांडे,श्याम खोडे,ज्ञानेश्वर धावडे,ऊमेश नावंदर,डाॅ,प्रमोद तायडे,यशवंत ठाकचे,मनोहर ढोकणे,अभिषेक दंडे देखील या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक राऊत,मनोहर ढोकने,यशवंत ठाकरे,ऊज्वल मिश्रा,नकुल निमकर्डे,बंडु भगत,सचिन ढोकणे,नेहाली ढोकने यांनी अथक परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे समालोचन राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सचिन ढोकणे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना नेहाली सचिन ढोकणे यांनी दिली. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये जलरक्षक,निसर्ग रक्षक,संस्कुती रक्षक,आरोग्य रक्षक,लोकशाहीचे शिलेदार आदि सन्मान चिन्ह देऊन अनेकांना गौरविन्यात आले .
यावेळी विशेषतः सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित करून त्यांच्या कामाचा गौरव 'लोकशाहीचे शिलेदार' म्हणून करण्यात आला. या पत्रकारांमध्ये सुधाकर क्षिरसागर,विरेंद्रसिंह ठाकुर,रमेश मुंजे,अमोल ठाकुर,विनोद डेरे,फुलचंद भगत,गजानन व्यवहारे,अशोक राऊत,राजकुमार ठाकुर,नाना देवळे,ऊज्वल मिश्रा यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रज्वल अशोक राऊत जि,प,शाळेच्या विद्यार्थ्याने जो बोयेगा वही पायेगा हे गित गाऊन कार्यक्रमात वातावरनाची निर्मिती केली तर अशोक राऊत यांनी बाप वनव्या मधे गारव्यासारखा हे गित गाऊन ऊपस्थितांना भावनिक केले
या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, आणि असे समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम अधिक प्रमाणात व्हावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206
0 टिप्पण्या