🌟परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केद्रांमध्ये बदल....!


🌟परभणी विधानसभा मतदार संघात 11 नवीन मतदान केंद्र🌟   

परभणी (दि.09 ऑगस्ट 2024) : परभणी विधानसभा मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव भारत निवडणुक आयोग, न्यू दिल्ली यांनी दिनांक 25 जुलै 2024 रोजी मान्य केला आहे. त्यानुसार 96-परभणी मतदार संघाअंतर्गत एकूण 11 नविन मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. 6 मतदान केंद्रातील मतदार बाजूच्या मतदान केंद्रात समाविष्ट, 25 मतदान केंद्र इमारती बदल करण्यात आला असून, 10 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे. परभणी विधानसभा क्षेत्रातील 11 नवीन मतदान केंद्र हे पुढीलप्रमाणे आहेत. 

मतदान केंद्र क्रमांक 76 वसंतराव नाईक प्राथमिक विद्यालय, जुना पेडगाव रोड खोली क्रमांक 1, मतदान केंद्र क्रमांक 91 बाल विद्याविहार अमेय नगर खोली क्रमांक 3, मतदान केंद्र क्रमांक 102 डॉ. झाकीर हुसेन माध्य. व उच्च माध्य महाविद्यालय उत्तर बाजू खंडोबा बाजार, ग्रंथालय कार्यालय, मतदान केंद्र क्रमांक 105 डॉ. झाकीर हुसेन वरिष्ठ महाविद्यालय, खोली क्रमांक 3, मतदान केंद्र क्रमांक 137 मोईदुल मुस्लिमीन हायस्कूल, महिला कक्ष उस्मानिया कॉलनी, मतदान केंद्र क्रमांक 160 फारान ऊर्दु शाळा, खोली क्रमांक 2, मतदान केंद्र क्रमांक 232 रामराव राठोड विद्यामंदिर खोली क्र. 2, अजिजीया नगर, मतदान केंद्र क्रमांक 245 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खोली क्रमांक 3, जिंतूर रोड, मतदान केंद्र क्रमांक 248 ज्ञानोपासक महाविद्यालय खोली क्रमांक 3, संगणक कक्ष, मतदान केंद्र क्रमांक 319 जि. प. प्रा. शा. ताडलिमला खोली क्रमांक 2, मतदान केंद्र क्रमांक 337 जि.प. प्रा. शा. नवीन इमारत जांब खोली क्र. 4 असे आहेत. 

तर 6 मतदान केंद्रातील मतदार बाजूच्या मतदान केद्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये 4 जि. प. प्रा. शा. झरी, मतदान केंद्र क्रमांक 61 ऐवजी 62 कार्यकारी अभियंता यांचे कक्ष म. रा. वि. पा. क. जिंतूर रोड परभणी, मतदान केंद्र क्रमांक 144 ऐवजी 145, 146 वसंतराव नाईक हायस्कूल खोली क्र.5 व 7, कारेगाव रोड परभणी, मतदान केंद्र क्रमांक 213 ऐवजी 215 राजर्षी शाहू महाविद्यालय खोली क्रं. 1 साखला प्लॉट, मतदान केंद्र क्रमांक 265 ऐवजी 262 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय खोली क्र. 1 आणि मतदान केंद्र क्रमांक 323 ऐवजी जि. प. कन्या शाळा कार्यालय पिंगळी असे समाविष्ट करण्यात आले आहेत. 

25 मतदान केंद्रांच्या इमारतीमध्ये बदल करण्यात आला आहे. तो जि. प. प्रा. शा. 16- टाकळी बोबडे आणि 38- सनपुरी येथील खोल्यांमध्ये बदल करण्यात आला असून, 100 व 101 हे डॉ. झाकीर हुसैन माध्य. व उच्च माध्य. महाविद्यालयाचे बदल अनुक्रमे 103 व 104 मधील खोली क्र. 3 व 2 असा करण्यात आला आहे. मतदान केंद्र क्रमांक 118 मधील खोली क्र. 1 व 2 ऐवजी 122 डॉ. मो. इकबाल उर्दु हायस्कूल खोली क्र. 14 व 15 मध्ये बदल असून, 127, 128 ऐवजी 131 आयडील उर्दु प्रा. शा. खोली क्र. 1 व 132 जवाहर कॉलनी येथे मतदान केद्र बदलले आहे. मतदान केंद्र क्रमांक 154 ऐवजी 159 फारान उर्दु प्रा. शा. खोली क्र. 1 असा बदल आहे. मतदान केंद्र क्रमांक 163 व 164 ऐवजी 169 व 170 राष्ट्रीय विद्यालय खोली क्र. 1 व 2 मध्ये बदल झाला आहे. 

मतदान केंद्र क्रमांक 187 व 188 ऐवजी 193 ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये बदल झाला आहे. मतदान केंद्र क्रमांक 226, 227, 228 ऐवजी 233 सदभावना मंडप भिमनगर येथील खोली क्र. अनुक्रमे 1, 2,3 असा असून, मतदान केंद्र क्रमांक 131, 232 ऐवजी 239 व 240 औद्योगिक प्रशिक्षण संस्था खोली क्र. 1 व 2 असा बदल केला आहे.    

मतदान केंद्र क्रमांक 233, 236 ऐवजी 240 व 243 ज्ञानोपास ऊर्दु हायस्कूल खोली क्र. 1 व 2 तर मतदान केंद्र क्रमांक 241 ऐवजी 250 मनपा पा्र. शा. सरस्वती म्युन्सिपल कॉलनी येथे तसेच 242 ऐवजी 151 प्राथ. व माध्य. आश्रमशाळा दर्गा रोड खोली क्र. 1 मध्ये बदल झाला आहे. 2 मतदान केंद्र क्रमांक257, 258, 259 ऐवजी अनुक्रमे 266, 267,268 शासकीय अध्यापक महाविद्यालय नवीन इमारत खोली क्र. अनुक्रमे 1, 2 आणि 3 असा बदल करण्यात आले असल्याचे 96-परभणी विधानसभेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप राजपुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या