🌟महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत परभणीत महिला मेळाव्याचे आयोजन - आ.राजेश विटेकर
परभणी (दि.०९ ऑगस्ट २०२४) : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे ह्या रविवार दि.११ ऑगस्ट रोजी परभणी दौर्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर व महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
या संदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आज शुक्रवार दि.०९ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख, गफार मास्टर, संजय कदम, राजू शिंदे, शंकर भागवत, नंदाताई राठोड आदी उपस्थित होते राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री तटकरे परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स येथे हा मेळावा होणार असून यावेळी त्या विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या योजनेबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडविल्या जाणार आहेत, अशीही माहिती आमदार विटेकर यांनी दिली......
0 टिप्पण्या