🌟हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदेने घातला दमदमा साहिब गुरुद्वाराला घाणीचा विळखा....‌!


🌟वसमत नगर परिषदेला पाच महिन्यापूर्वीच देण्यात आले होते निवेदन : नगर परिषद प्रशासनाचा निष्क्रिय कारभार उघड🌟 


हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील शीख धर्मांचे पवित्र असलेले दमदमा साहिब गुरुद्वारा परिसराला ड्रेनेच्या पाण्याचा विळखा घातल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याची प्रतिक्रिया सिख समाजातून उमटत आहेत.


   वसमत येथील दमदमा साहिब गुरुद्वारा परिसरातील ऐतिहासिक तलावात आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी व ड्रेनेजच्या पाण्याचा नाला तलावामध्ये सोडण्यात आला आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिबच्या व्यवस्थापन व अख्खत्यारीत ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगरला येतो. या गुरुद्वाराला देश-विदेशातील भाविक भेट देतात. परंतु परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात त्यामुळे यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी  व गुरुद्वाराचे पावित्र्य भंग होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अतिक्रमणधारकांचे सांडपाणी व ड्रेनेजच्या पाणी रोखून संबंधितावर कारवाई करण्यासाठी हजुरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजितसिंघ बिशनसिंघ, परदिपसिंघ जितसिंघ रागी, जगदिपसिंघ नंबरदार, मनबिरसिंघ ग्रंथी यांच्या शिष्टमंडळाने हिंगोली जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी वसमत, तहसीलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांना भेटून याप्रकरणी  निवेदन देऊन ड्रेनेचे पाणी रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.


  वसमतनगर परिषदेला पाच महिन्यापूर्वी निवेदन दिले असताना देखील प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने प्रशासन जाणीवपूर्वक गुरुद्वारा परिसराला घाणीच्या विळख्यात लोटत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या