🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश.....!


🌟या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार संपन्न🌟 

पूर्णा (दि.१२ ऑगस्ट २०२४) :- पुर्णा येथील येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाने  नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आतंर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धेचे आयोजन उत्कर्ष महाविद्यालय, सगरोळी येथे करण्यात आले होते. येथे पार पडलेल्या जलतरण क्रीडा स्पर्धेत 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात वैभव हिवरे याने द्वितीय तर 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात शिवाजी बोईनवाड याने प्रथम क्रमांक पटकावला.

 त्यांच्या या यशाबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा पुष्पहार व मेडल देवून महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. क्रीडा संचालक डॉ भारत चापके यांनी त्यांना मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दता पवार,महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या