🌟परभणी जिल्हा बालरंगभूमी परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर....!


🌟परभणी जिल्हाध्यक्षपदी आबा ढोले तर कार्याध्यक्षपदी उपेंद्र दुधगावकर यांची निवड🌟 

परभणी (दि.08 ऑगस्ट 2024) : परभणी जिल्हा बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी आबा ढोले तर उपाध्यक्षपदी प्रा. नितीन लोहट कार्याध्यक्षपदी उपेंद्र दुधगावकर, प्रमुख कार्यवाह पदी त्र्यंबक वडसकर यांची निवड करण्यात आली आहे.

              बालरंगभूमी परिषद मुंबई या केंद्रीय संस्थेच्या अंतर्गत जिल्हा शाखा परभणी बालरंगभूमी परिषदेची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी विजय करभाजन, किशोर पुराणिक, प्रा. रविशंकर झिंगरे, गिरीश कर्‍हाडे तर अध्यक्ष म्हणून आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर, प्रमुख कार्यवाह  त्र्यंबक वडसकर,  सहकार्यवाह  डॉ. अर्चना चिक्षे,  कोषाध्यक्ष  संजय पांडे यांच्यासह समन्वयक म्हणून प्रमोद बल्लाळ, कार्यकारी सदस्य मनीषा उमरीकर, प्रा. किशोर विश्‍वामित्रे, सचिन आढे, प्रकाश बारबिंड यांची निवड करण्यात आली.  यावेळी लेखक दिग्दर्शक विनोद डावरे, अतुल साळवे, नागेश कुलकर्णी, प्रशांत ढोले, अभिजीत सराफ आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शक विजय करभाजन, किशोर पुराणिक यांच्या हस्ते निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

            दरम्यान, बालरंगभूमी परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नीलम शिर्के- सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर  लोककला प्रशिक्षण व भव्य लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती नूतन अध्यक्ष आबा ढोले यांनी दिली. तर नोव्हेंबर महिन्यात बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट यांनी म्हटले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या