🌟एचएआरसी तर्फे ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळा🌟
परभणी : वयात येतांना सध्या मोबाईल व टीव्ही वरील वाढता स्क्रीनटाईम, आहारात फास्ट फूड, जंक फूड च्या अतिवापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे पाळी येण्याचे वय खालावत चालले आहे. म्हणून मुलींनी वयात येताना होणार्या बदलाविषयी जास्तीत माहिती घ्यावी, असे आवाहन डॉ. आशा चांडक यांनी केले.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अॅन्ड चॅरिटीज तर्फे बुधवार 28 ऑगस्ट रोजी क्विन्स स्कुल येथे किशोरवयीन मुलीसाठी 118 व्या ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत 6 वी ते 10 वी तील 200 किशोरवयीन मुली, महिला शिक्षिकांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख अतिथी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ .आशा चांडक, पद्मा भालेराव, प्रा. डॉ . सुनील मोडक यांची उपस्थिती होती.
डॉ. आशा चांडक यांनी, किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओडी, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.
प्रस्ताविक डॉ. सुनील मोडक यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एचएआरसीचे अध्यक्ष चांडक, प्रा. मोडक, पद्मा भालेराव, शाळेतील शिक्षिका ताहेरा फातेमा, आर्शिया कुरेशी, पुजा शिवाजी कुंभार, योगिता देशमुख, एस. मिंधु यांनी प्रयत्न केले......
0 टिप्पण्या